नवीन लेखन...

जीवनाची उपयोगिता

अल्प वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची  ।

मना वाटते आगळे करावे,  उरली वर्षे जीवनाची….१,

वृधत्वाचा काळ गांजता,  साथ न देयी शरीर कुणाला  ।

मना मारूनी बसावे लागे,  एक जागी सर्वाला….२,

निसर्गरम्य स्थळ निवडूनी,  मर्यादेत जगावे जीवन  ।

दुजास कांहीं येईल देता   हेच ठरवावे आजमावून…३,

बरेच केले स्वत:साठीं,  समाधान परि नाहीं लाभले  ।

दुजास मिळतां आनंद येई,  खरे तत्त्व आज जाणले….४,

जेंव्हां असते स्वत: करीता,  स्वार्थी भाव लपला असे  ।

दुजासाठी करीता सारे , स्वार्थी भाव राहील कसे ?….५,

शेवटचे सरते जीवन,  ईश चरणी समर्पण व्हावे  ।

अंतिम विनंती हीच,  दुजाच्या सेवेतच निघून जावे…६

 

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..