वरझडी हे औरंगाबाद तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटसं गाव या गावात माणिकराव पठारे यांची दोन एकर जमीन आहे. टोमॅटो, कोबी, वांगी, भेंडी अशा विविध प्रकारच्या भाज्या पिकवणं हा त्यांचा व्यवसाय. शेतात दोन विहीरी. दोन्ही विहिरींतील पाणी भाजीच्या मळ्याला पुरवणं हा नेहमीचा कार्यक्रम. रुसलेल्या वरुण राजामुळे या कार्यक्रमात अडथळा निर्माण झाला. २०१२ साली पाऊस आला कधी आणि गेला कधी कळलंच नाही. नद्या, ओढे, विहिरी, शेतं कुठेच पाणी साठलं नाही पाण्याशिवाय भाज्या पिकवणं कठीण झाडं.माणिकरावांनी टोमॅटो, वांगी ही कमी पाणी लागणारी दोनच पिकं घेण्याचं ठरवलं. काही दिवसांनी टोमॅटोला सुध्दा शेतातून बाहेर काढावं लागलं. वांगी ही एकमेव भाजी पिकवण्याची तयारी त्यांनी केली. असक्तपणा आल्यावर किंवा आजारपणात सलाइन लावण्यात येत. सलाइन लावल्यामुळे तब्येतीत सुधारणा होते. माणिकरावांनी अशक्त झालेल्या पिकाला सलाइनच्या बाटलीतून पाणी देण्याचं ठरवलं.
— सुचेता भिडे
Leave a Reply