सुरुवातीलाच डाॅ. प्रदीप कुरुलकर म्हणजे कोण हे सांगतो. डाॅ. कुरुलकर यांनी जवळपास सहा वर्ष भारतरत्न अब्दुल कलाम आझाद यांच्यासोबत भारताच्या विविध वैज्ञानिक प्रकल्पावर काम केलं आहे. सन १९९८ साली पोखरण येथे वाजपेयी सरकारने केलेल्या अणूस्फोट चाचण्यांसाठी देशभरातील शास्त्रज्ञांपैकी जे फक्त ३५ शास्त्रज्ञ निवडले होते, त्यापैकी एक डाॅ. कुरुलकर होते.
आता मुख्य कथा. माझ्याकडे एक गाडी आहे..दिड दशक जुनी आहे. विकून नविन घ्यावी यासाठी घरातले मागे लागले आहेत. मित्र तर तुझी ‘सायराबानू’ म्हणून हेटाळणीनेच बोलतात. सोसायटीतल्या नविन गाड्यांमधे जुनी असूनही देखणी (किंवा चारचौघींपेक्षा ‘वेगळी’) दिसते म्हणून सोसायटीवालेही थोडेसे द्वेष मिश्रीत हेव्याने बघतात. पण या कशाकशाचा माझ्यावर ढिम्म परिणाम होत नाही.
मी ती गाडी काढायला अजिबात तयार नाही कारण ती माझ्यावर आणि मी तिच्यावर जिवापाड प्रेम करतो. मला हसणाऱ्या माझ्या मित्रांना मी नेहेमी सांगतो की, बाबांनो माझ्यासाठी ती निर्जीव वस्तू नाही. तिला माझी भाषा कळते, तिची मला कळते..तिच्यावरनं प्रेमाने हात फिरवलेला तिला जाणवतो हे मला जाणवतं. म्हणजे तिला आत्मा आहे. ती गुरगुरते, चालते, पळते, माझ्या मनाप्रमाणे वागते म्हणजे तिच्यात जीव आहे. आणि यावर माझा नितांत विश्वास आहे..
हे सर्व सांगण्याचं कारण म्हणजे काल ‘जनसेवा समितीने’ प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या मिनी सभागृहात आयोजित केलेलं डाॅ. प्रदीप कुरूलकरांचं व्याख्यान..!
त्यांनी सांगीतलेलं मला शब्दांत नीटसं मांडताही येणार नाही. जेंव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते की सूर्य पृथ्वीभोवती, याचा खल पाश्चात्य देशात सुरू होता त्याच्या शेकडो (की हजारो?) वर्ष अगोदर लिहील्या गेलेल्या ऋग्वेदातील ऋचेत याचं सटीक उत्तर दिलेलं होतं..अश्या विश्वाच्या गहन वाटणाऱ्या आणि आजही न उलगडलेल्या अनेक कोड्यांची उत्तरे भारतीय शास्त्रकारांनी हजारो वर्षांपूर्वीच देऊन ठेवलीत. या ग्रंथांकडे हेटाळणीने न बघता त्यांचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज असल्याचं आणि स्वत: तसा प्रयोग असल्याचंही डाॅ. कुरुलकरांनी आवर्जून सांगीतलं..
आज दि. १४ आॅगस्टच्या ‘दै.लोकसत्ते’तील श्रीम. लीना दामले यांनी लिहीलेला “‘सर्न’द्वारी नटराज!” हा लेख वाचल्यास डाॅ. कुरुलकरांना त्यांच्या कालच्या भाषणातून नेमकं काय म्हणायचं होतं हे कळेल.
डाॅक्टरांनी काल जे सांगीतलं ते मनापासून पटलं. “निर्जीव वस्तूतही जीव असतो” हे डाॅ. कुरुलकरांनी मांडलेलं प्रमेय ऐकून मी माझ्या गाडीच्या बाबतीत वेड्यासारखा (इतरांच्या म्हणन्याप्रमाणे) विचार करत नव्हतो हे उनजून त्या सभाृहातल्या कोणाहीपेक्षा मला जास्त आनंद झाला. ‘निर्जीव’ शब्दातच ‘जीव’ आहे म्हणजे त्यात भावना असतात ही माझी श्रद्धा होती आणि आहे परंतू त्यामगचं विज्ञान कळत नव्हतं. डाॅ. कुरुलकरांचं कालचं भाषण ऐकून माझ्या श्रद्धेला आधार मिळाला..आपल्या वस्तूंवर मनापासून प्रेम करणारे अनेक वेडे असतील मात्र ती वस्तूही आपल्यावर प्रेम करते हे जाणवणारे वेडXX मात्र खुप दुर्मीळ..!
डाॅ. कुरुलकरांचं कालचं व्याख्यान डोळे उघडवणारं होतं आणि ज्यांचे डोळे उघडे आहेत त्यांना ‘दृष्टी’ देणारं होतं..श्री. रेगे साहेब, श्री. साठे साहेब असा ‘दृष्टी’ देऊन संपन्न करणारा कार्यक्रम आम्हाला दिल्याबद्दल आपले मनापासून आभार..!
— गणेश साळुंखे
9321811091
Leave a Reply