ऑस्ट्रेलियन माजी वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५० रोजी झाला.
जगातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून नावाजलेले जेफ थॉमसन हा नेहमीच त्याच्या वेगासाठी ओळखला गेला. त्याच्या काळातील तो सर्वात वेगवान गोलंदाज होता. त्याने १९७५ला पर्थ येथे वेस्ट इंडिज विरुद्ध १६०.६ किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता. हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान चेंडू होता. त्यांची जिद्द आणि खेळाप्रति निष्ठा हे तमाम क्रिकेटपटूंसाठी एक उदाहरण ठरावे. पायाचे हाड मोडलेले असतानाही ते खेळले, हे कोणालाच माहित नव्हते. मात्र दुखापतीचा परिणाम त्यांच्या वेगावर कधीच दिसला नाही. दुखापतींमुळे थॉमसन सातत्याने खेळू शकले नाहीत. ते संघात असायचे, तेव्हा ऑस्ट्रेलियाचा विजय जवळपास निश्चित असायचा.बारा वर्षामध्ये ५१ कसोटी खेळणा-या थॉमसन यांच्या नावावर २०० विकेट्स असून पाचहून अधिक विकेट्स घेण्याची करामत त्यांनी आठ वेळा साधली आहे. १९७४-७५ मध्ये ऑस्ट्रेलियाला अॅशेस जिंकून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply