जेथें मोह सापडे
तेथें निग्रहाने जगावे
अनुग्रहाने जीवनी
समाधान मिळवावे!!
मोह सुटणे अशक्य
तया अवेळी ठरते भाग्य
अन मग पुढे जाऊनी
पश्चात्ताप होतो!!
अर्थ-
एखाद्या गोष्टीचा मोह होणं काही गैर नाही. अजिबातच चुकीचं नाही पण, त्या मोहा पायी आपण चुकीचं काही वागत नाही ना? हे लक्षात येणे गरजेचे असते. मोह कोणाला नाही? मोह सर्वांनाच, पण तेथे मनाचा निग्रह असला की त्याचा योग्य प्रकारे उपभोग घेता येतो. मोह कसलाही होऊ शकतो काम, कर्म, वासना, निश्चय, स्वार्थासाठी, समाजासाठी, कर्तव्यांसाठी पण तिथे ब्रेक असला की मग त्यातून आनंद, पूर्णत्व, सुख हे मिळते.
याचा अर्थ एखादी गोष्ट तोलून मापूनच करायला हवी अस नाही तर ती गोष्ट योग्य वेळी, योग्य ठिकाणी आहे का? हे तपासुन पहावे म्हणजे त्याचा पुढे जाऊन पश्चाताप होणार नाही. एखाद्या गोष्टीचा मोह होणं काही वाईट नाही पण तिचा अतिरेक होणं कधीही वाईट आणि त्यातून होणारे परिणाम दुःखच घेऊन येतात.
ठरवावे आपले आपण, मोह कशासाठी घ्यावा
सुख मिळावे त्यातूनी, की पश्चाताप व्हावा!!
— सुमंत परचुरे.
Leave a Reply