नवीन लेखन...

जेवणाची बैठक कोणती ?भाग १

ज्या बैठकपद्धतीमधे मलविसर्जन केले जाते, त्याच पद्धतीने अन्नसेवन करावे. याचा ग्रंथोक्त आधार मला माहीत नाही. पण व्यवहारात काय आहे आणि काय होत असेल, याचा एक विचार

पाश्चात्य लोकांना मांडी घालून जमिनीवर बसणे हा प्रकारच माहीत नाही. उकीडवे बसणे तर दूर दूर की बात.

ऊकीडवे बसून जेवायची आपली पद्धत होती. कालांतराने मांडी घालून (सुखासन ) बसायला सुरवात केली. ज्याला आपण आज भारतीय बैठक म्हणतो.

गावाकडे अजूनही पुरूष मंडळी पंगतीमधे जेवताना, उकीडवे बसूनच जेवतात. दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून बसणे, म्हणजे ऊकीडवे बसणे.
उकीडवे बसल्याने दोन्ही मांड्या पोटावर दाबल्या जातात. जेवतानाच पोट दाबून जेवले गेल्याने अनावश्यक जेवण जात नाही. त्यामुळे तब्येत सडसडीत रहाते. पोट सुटत नाही. पोटात वात साठून रहात नाही. तयार झालेला गॅस लगेच बाहेर पडून जातो. पोट हलके होते.
हा पोटातील गॅसचा दाब इतर अवयवांवर न पडल्यामुळे तेही खुश.

समजा, दाटीवाटीने एका कोचवर (बाकावर) चार माणसे बसली आहेत. त्याच बाकावर आणखी दोघांना बसायला सांगितले तर ? कोंबून ठोसून बसलेच, तर पहिले चार जण, जे आरामात बसले होते, त्यांना आपल्या हालचालींवर निर्बंध आणावे लागतील. त्यांच्या हालचाली मर्यादित होतील.

अगदी तसेच पोटातील अवयवांचे होते. यकृत, प्लीहा, अग्न्याशय, किडनी, आणि त्याच्याच वरच्या मजल्यावर रहाणारे ह्रदय, फुफ्फुसे, यांच्यावर आतड्यातील गॅसचा अतिरिक्त दाब सतत पडत रहातो.

हा गॅस तयार होता होता जर बाहेर पडला तर त्रास होणार नाही. पण जर ही हवा आतच साठून राहीली तर, या सर्व अवयवावर अतिरीक्त दाब पडतो. आणि त्यांचे आयुष्य कमी होते.

हा दाब किती असतो, कल्पना आहे ?
अहो, याच दाबून ठेवलेल्या वाताच्या जोरावर, त्या जेम्स वॅटने म्हणे वाफेचे इंजीन चालवले होते.

आता हा वाताचा दाब आत जर वाढला तर, या पैकी एका अवयवांवर दाब येणार हे निश्चित. मग त्या अवयवाने कधीतरी अचानक संप करून, त्याच्यावर पडणारा अतिरीक्त ताण कमी करण्याची मागणी केली तर, चुक आहे का ?

अवयवांनी ही अशी मागणी करणे, म्हणजेच विशिष्ट रोगाची लक्षणे होत.
म्हणजेच हा ताण अतिरिक्तरीत्या वाढू नये यासाठी प्रयत्न करणे म्हणजे अवयवांना संपावर जाण्यापासून रोखणे.

हे सर्व एका आसनामुळे शक्य आहे, ते म्हणजे उकिडवे बसून जेवणे.

आताच्या काळात जरा “मॅनरसलेस” वाटेल, पण त्याला पर्याय नाही.

जसे आसन तसे मलविसर्जन.

टेबलखुर्ची घेऊन जेवायला काटकोनात बसले की, मलविसर्जन पण काटकोनातच केले जाते ना ! कमोडवर बसून हो !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
17.09.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..