देव आनंद यांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाची जादू आजही कायम आहे. देव आनंद, वैजयंती माला, तनुजा आणि अशोक कुमार महत्त्वाच्या भूमिकेत होते. ज्वेल थीफ मधील गाणी अजून ही लोकाच्या ओठावर आहेत. संगीत एस.डी.बर्मन यांनी दिले होते. यांचे गीतकार होते शैलेंद्र व मजरूह सुल्तानपुरी. ये दिल ना होता बेचारा, रुला के गया, आस मा से नीचे, बेठे हे क्या उसके पास, रात अकेली हे, होठोंपे ऐसी बात, दिल पुकारे आरे आरे, ही लता किशोर आशा व भूपेंदर यांनी गायलेली सर्व गाणी गाजली.
विजय आनंद यांचा हा रहस्यपट बनवण्याच्या पहिला प्रयत्न होता तो बॉक्स ऑफिसवर हिट गेला पण या चित्रपटाला काही खास अवॉर्ड मिळाले नाहीत, पण आज ही टेलिविजन, यू ट्यूब वर हा चित्रपट बघितला जातो.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply