आज यूट्युबवर एक गाणे समोर आले आणी मन भूतकाळात गेले.’मैंने पायल है छनकायी’कॉलेजच्या दिवसांत हे गाणे टीव्हीवर लागायचे आणी मुली त्याला पाहून आपल्या राजकुमाराची स्वप्न रंगवायच्या.सोनेरी स्वप्न पहायचे दिवस होते ते.मन पाखरु होण्याचे दिवस…
आमचे मुलींचे कॉलेज.बर्याच पाखरांच्या नजरा भिरभिरत असायच्या तेव्हा सलमान ऐश्वर्याचा एक चित्रपट तूफान चालला होता.त्यात सलमान तडपत जेव्हा ‘लुट गए लुट गए’ गायचा काहीजणींचा अगदी जीव अर्धा व्हायचा. अजून एक किस्सा आठवला.एके दिवशी मी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी आवरत होते.रेडिओवर वर गाणी लावून..हे रोजच चालायचं.गाणं लागलं ‘झुकी झुकी सी नजर’.थोडसं ऐकलं आणी कॉलेजला निघाले.पहिल्यांदाच ऐकली ही गज़ल आणी फारच आवडली.दिवस भर दोनच ओळी गुणगुणत होते, तेवढ्याच पाठ झाल्या होत्या.दोन मैत्रिणींनी “काय गं प्रेमात पडलीस का कुणाच्या’ म्हणत माझी फिरकी घेतली. त्या दिवशी दुपारी एक लेक्चर मधे मुलींनी मॅडम ना गायचा आग्रह केला आणी मॅडम ने सुरु केले ‘झुकी झुकी सी नज़र’…त्यांनी पूर्ण गायली ती.काय आनंद झाला.
खरंच मी या नजरेच्या प्रेमात पडले व आजही प्रेमात आहे.ही गज़ल मला अतिशय आवडते.जगजीतसिंह यांचा आवाज व याच्या सुरावटी यांच मनावर गारुड होतं.
सौ. गौरी काळे
Leave a Reply