जुडोचे संस्थापक जिगोरो कानो जन्म २८ ऑक्टोबर १८६० रोजी झाला.
जुडोची सुरवात १८८२ साली डॉ. जिगोरो कानो यांनी केली होती. जिगोरो कानो यांचा जन्म एका संपन्न परिवारात झाला होता. त्यांचे आजोबा जपान मध्ये यशस्वी मद्य निर्माता होते. त्यांचे वडील एक पुजारी होते परंतु लग्नानंतर ते सरकारी अधिकारी बनले. जिगोरो कानो यांना लहानपणा पासूनच चांगले शिक्षण मिळाले. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांना इंग्रजी, जपानी लिपी शिकवण्यात आली होती.
चौदा वर्षाचे असताना कानो यांनी टोकियो मधील इंग्रजी माध्यमाच्या वसतिगृहात प्रवेश घेतला. कानो उंची व वजनाने कमी होते. यामुळे बऱ्याच वेळा शाळेतील दांडगट मुले त्यांना त्रास देत असत. म्हणून त्यांनी जुजुत्सु शिकवणारे कोणी भेटते का याचा शोध घेतला पण त्यात त्यांना फारसे यश आले नाही कारण तेव्हा पाश्चिमात्यांच्या वाढत्या प्रभावामुळे ही कला नाहीशी होण्याच्या मार्गावर होती. लोकांच्या जुजुत्सु बाबतच्या अनासक्त्येमुळे ही कला शिकवणाऱ्या बऱ्याच लोकांना नोकरी गमवावी लागली होती अथवा त्यांचा ह्यावरचा विश्वास उडाला होता. कानो यांना अनेक माणसे भेटली ज्यांना ही कला ज्ञात होती पण त्यांनी शिकवण्यास मात्र नकार दिला. बराव शोध घेतल्यानंतर त्यांना फुकुडा नावाचे शिक्षक भेटले ज्यांनी त्याला शिक्षण दिले. त्यानंतर त्यांनी इसो मासातोमो व आयकुबो सुनेतोशी यांच्या द्वारे शिक्षण मिळवले. पुढे जाऊन त्यांनी शिकलेल्या अनेक कलांचे मिश्रण करून जुडो ह्या शाखेची सुरवात केली. पुढे जुडो ही कला शारीरिक, मानसिक आणि नैतिक अध्यापनासाठी जपानमध्ये उदयास आली.जुडोला आता एका खेळांचे स्वरूप प्राप्त झाले असले तरीही त्याची सुरवात आत्मरक्षा करण्यासाठी एक उपाय म्हणून झाल होती. जुडोच्या प्रसिद्धीचे एक कारण हे आहे की या साठी वयाचे बंधन नसते. तुम्ही कोणत्याही वयात जुडो शिकू शकतात आणि तुम्ही जुडो मध्ये पारंगत झाल्यानंतर आपल्या पेक्षा दुप्पट आकाराच्या व्यक्तीला देखील सहज हरवू शकता. जुडोचा सराव करणाऱ्या व्यक्तीला जुडोका’ म्हणतात.
जिगोरो कानो यांचे निधन ४ मे १९३८ रोजी झाले.
आज गुगलने जिगोरो कानो यांच्या जन्मदिना निमीत्त त्यांचे डूडल बनवले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply