नवीन लेखन...

“जीमॅक”च्या जागतिक स्पर्धेत औरंगाबादचा प्रीतेश सिकची तृतीय

पदवीधर व्यवस्थापन प्रवेश परिषदेतर्फे (जीएमएसी) ‘आयडियाज टू इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये औरंगाबादमधिल प्रीतेश सिकची तृतीय आला आहे. प्रीतेशच्या या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात आणखी एका विद्यार्थ्याने औरंगाबादचा झेंडा रोवला असल्याची भावना व्यक्त होत आहे. उद्याच्या व्यवस्थापन शिक्षणाच्या (एमईटी) निधीअंतर्गत ‘कोणती एक कल्पना पदवीधर व्यवस्थापन शिक्षणात सुधारणा घडवून आणील?’ असा

प्रश्न जीमॅकने या स्पर्धेत विचारला होता. व्हीआयटी, पुणे येथून अभियांत्रिकीचा पदवीधारक असलेल्या प्रीतेशने ‘ग्रीन कोटेशन’ ही स्वत:ची सल्लागार कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनी कार्बन क्रेडिट आणि रिन्यूएबल एनर्जी या क्षेत्रांत प्रामुख्याने कार्य करते. ”जीमॅटद्वारे एमबीए करण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी मी जीमॅटची वेबसाईट नेहमी पाहत होतो. जीमॅक ही त्यांची शिखर संस्था आहे. ही स्पर्धा म्हणजे जगभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हानच असते. दिलेल्या विषयासंदर्भात माझ्या काही कल्पना होत्या. त्यामुळे मी प्रवेश अर्ज भरला. मी विविध बिझिनेस स्कूलचे अर्ज भरत असल्याने मला निबंध स्वरूपात लिहिता येत होतेच. जीमॅकने ६० देशांतून सुमारे ६०० प्रवेशिका मागवल्या होत्या. तीन टप्प्यांत त्याची छाननी झाली. प्रत्येक टप्पा ओलांडल्यानंतर माझ्या अपेक्षा उंचावत गेल्या आणि अखेर मी तिसरा क्रमांक पटकावला,” अशी प्रतिक्रिया प्रीतेशने व्यक्त केली. या स्पर्धेसाठी जागतिक स्तरावर प्रथम बक्षीस एक, द्वितीय क्रमांकाची चार आणि तृतीय क्रमांकाची १० बक्षिसे असतात, त्यामुळे एकूण १५ कल्पना मिळाल्या आहेत, असेही त्याने सांगितले. व्यवस्थापन शिक्षणात सुधारणा करण्यासाठी १० दशलक्ष डॉलर एवढा निधी असलेल्या एमईटीने २००८ मध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेसाठी २ लाख ६० हजार डॉलर एवढा निधी निश्चित करण्

यात आला होता. प्रथम बक्षीस विजेत्यास ५० हजार डॉलरचे बक्षीस मिळणार आहे. मला १० हजार डॉलरचे बक्षीस मिळाले आहे. ही रक्कम मी गुंतवणार आहे किवा इतर कल्पनांसाठी वापरण्याचा माझा विचार आहे.

आता ही स्पर्धा दुसऱ्या टप्प्यांत पोहोचली आहे. आता जीमॅटशी संलग्न टॉप बिझिनेस स्कूलसमोर या कल्पना मांडण्यात येतील. त्यानंतर त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल. माझ्या यशात माझी आई रेणुका आणि वडील प्रवीण सिकची यांचा मोठा वाटा आहे, असे प्रीतेशने कृतज्ञतेने नमूद केले.

— बातमीदार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..