जिथे पंढरी, तेथे वारकरी
दर्शने जाता पूजी तुकाची पायरी
पंढरीचा देव जेथे देव न राहिला
पायरी वरचा तुका, मुका मी पाहिला!!
अर्थ–
महाराजांनी नेताजी पालकर यांस फितूर होऊनही एकदा स्वगृही परत आणले, धर्मांतर झाले हे माहीत असूनही परत हिंदू करवूनी कार्य धाडीले, परंतु सरसेनापती पद बहाल न केले. पण आता काळ बदलला आहे आता पक्ष सोडून, पदास लाथ मारून दुसऱ्या पक्षात गेलेल्या लोकांना परत पक्षात आणून रेड कार्पेट घालून त्यांना पूर्वीचे पद बहाल केले जाते कारण आता धर्म नव्हे तर पैसा बोलतो.
मुळांत म्हंटले जाते की अपेक्षा ठेवणे चुकीचे असते पण, ती चूक पुन्हा पुन्हा करणे हा मनुष्याचा धर्म आहे. जर माणसाने अपेक्षा करणे थांबवले तर तो भगवंत नाही का होणार? म्हणून मी म्हणतो अपेक्षा करणे हे मनुष्य पणाचे लक्षण आहे. पण येथे अपेक्षा ठेवताना, आपण किती अपेक्षा पुर्ती करतो याकडे सर्वप्रथम पाहणे जास्त गरजेचे आहे.
बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी.
वडिलोपार्जित लावलेल्या झाडाला कधी प्रेमाने पाहायचं नाही, त्याला कधी पाणी घालायचं नाही, येता जाता त्याला तिखट शब्दांनी भिजवायचे पण, अपेक्षा मात्र रसाळ फळाची, दाट सावलीची ठेवायची याला काय अर्थ उरेल? केवळ पैसा मिळवणे म्हणजे अपेक्षा पुर्ती करणे नव्हे तर त्याबरोबर प्रेमाचा ओलावा, रसाळ शब्दांचा पेटारा जर जोडला गेला तर तुका या पेक्षा तुकाराम हा शब्द पूर्ण होईल.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply