कार्तिकी एकादशीला
चंद्रभागेच्या तिराला
विटेवरी तू तिष्ठला
तुझ्या भक्त भेटीला ।।१।।
ध्वज-पताका घेतल्या
मुखी ओव्याच रंगल्या
दिंड्या पंढरी चालल्या
त्या रिंगणी दंगल्या ।।२।।
मुखी गजर नामाचा
घुमे नाद चिपळ्यांचा
सुर निनादे विणेचा
भरे मेळा वाद्यांचा ।।३।।
वाळवंटी वारकरी
जमले पंढरपुरी
दर्शना आतुर सारी
रांगेत रात भरी ।।४।।
जिथे तिथे रुप तुझे
पदी लिन शिर माझे
आशिर्वच घेण्या तुझे
पंढरी येणे माझे ।।५।।
— रचना
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
ओवी
८-८-८-७
Leave a Reply