Last Updated: 23 October 2021
जॉन बॉईड डनलॉप हे लहानपणीच वडीलांच्या बरोबर आर्यलंड मध्ये गेले. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १८४० मध्ये आयरशायर परगण्यातील ड्रेगहॉर्न मध्ये झाला. तिथे त्यांनी पशुवैद्यकाचा अभ्यास केला. एक चांगला पशुवैद्य म्हणुन त्यांची ख्याती झाली होती. बरीच वर्ष त्यांना सायकलवरून फिरावे लागे त्याकाळी सायकलची चाके लोखंडी असत त्यामुळे सायकल चालविणे जिकीरीचे असे त्यामुळे त्याने यावर काही करता येइल का म्हणून संशोधन सुरु केले.
खरे रोबर्ट थाम्सन याने रबरी पिशवीत हवा भरण्याचे तंत्र डनलॉपचे अगोदर शोधले होते परंतु रबराची कमतरता असल्याने ते मागे पडले त्यात अनेक त्रुटी होत्या त्या जॉन बॉईड डनलॉप यांनी दूर करून त्याचे पेटंट मिळविले. १८८८ मध्ये डनलॉप कंपनीने पोकळी रबरी धावा (न्युमॅटिक टायर्स) ची कल्पना अस्तित्वात आणली. त्यामुळे मोटारींना टायर ट्यूब बसविणे शक्य झाले.
जॉन डनलॉप यांचे निधन २३ ऑक्टोबर १९२१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply