नवीन लेखन...

‘विस्डेन’या जगप्रसिद्ध क्रिकेट मासिकाचे संपादक – जॉन विस्डेन

१९५० मध्ये लॉर्ड्सवर साउथच्या एका डावात सर्वच्या सर्व म्हणजे १० फलंदाजांना त्रिफळाचित करण्याचा विक्रम जॉन विस्डेन यांनी केला आहे. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १८२६ रोजी झाला.

विस्डेन हा इंग्लंडच्या दक्षिणेकडच्या ब्रायटन नावाच्या समुद्रकिनार्या१नजीकच्या सुंदर भागात राहायचा. विस्डेनची फलंदाजी बर्यानपैकी चांगली असली तरी तो प्रामुख्यानं गोलंदाज म्हणूनच गाजला. पण दुर्दैवानं विस्डेनच्या कामगिरीचे अनेक तपशील नष्ट झाले असल्यामुळे त्याविषयी फारसं माहीत नाही. त्यातून वाचलेल्या माहितीनुसार लॉड्सवर दोन वेगवेगळ्या सामन्यांच्या दोन्ही डावांमध्ये विस्डेननं सुरुवातीपासून शेवटपर्यंत न थकता गोलंदाजी टाकली होती. तसंच अमेरिकेमध्ये एकदा त्यानं ६ चेंडूंमध्ये ६ बळी घेतले होते.

विस्डेनच्या गोलंदाजीशी संबंधित असलेलं सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे मुळात अतिशय कृश शरीरयष्टी असूनसुद्धा विस्डेन इतका वेळ गोलंदाजी कशी टाकू शकायचा हेच होतं. १८२६ साली जन्म झालेल्या विस्डेननं वयाच्या विसाव्या वर्षी ससेक्सकडून खेळायला सुरुवात केली तेव्हा ५ फूट ४ इंच एवढीच उंची आणि जेमतेम ४५ किलो वजन अशा विस्डेनला बघून ‘हा काय गोलंदाजी टाकणार’ असं सगळ्यांना वाटायचं. काही वर्षांनी विस्डेनच्या वजनामध्ये थोडी वाढ झाली असली तरी तो क्रिकेटपटू म्हणून अजिबातच शोभत नाही असं सगळ्यांना वाटायचं. संघात प्रत्येकी फक्त एक खेळाडू असलेल्या म्हणजेच ‘सिंगल विकेट’ सामन्यांमध्ये तर विस्डेनला कुणीच हरवू शकायचं नाही. विस्डेनमध्ये दमछाक न होता बराच वेळ खेळू शकण्याची आश्चर्यकारक क्षमता होती. त्यामुळेच त्याला हे सगळं शक्य होई.

१८६३ साली विस्डेननं क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली खरी, पण इतर अनेकांप्रमाणे क्रिकेटच्या इतिहासामधून आपलं नाव सहजपणे विसरलं जाणार नाही याची काळजी विस्डेननं घेतली होती. पूर्वीपासूनच विस्डेनमध्ये वेगवेगळे उद्योगधंदे करून बघायचं धाडस होतं. तसंच त्याचं संघटनकौशल्यही चांगलं होतं.विस्डेननं वेगवेगळे व्यवसाय करून बघितले होते. १८५५ साली फ्रेड लिलिव्हाइटच्या साथीत विस्डेननं ‘क्रिकेटची उत्पादनं आणि सिगार बनवायचा व्यवसाय’ करून बघितला होता. त्यात फारसं यश न आल्यामुळे नंतर हा उद्योग बंद करून टाकण्यात आला. पण म्हणूनच विस्डेनच्या क्रिकेटच्या वार्षिक नियतकालिकाची सुरुवात हा त्याचा पहिला व्यवसाय नव्हता हे लक्षात घेतलं पाहिजे. तसंच विस्डेन हा क्रिकेटचं नियतकालिक काढणारा पहिलाच माणूस नव्हता. अनेक जणांनी क्रिकेटशी संबंधित असलेलं लिखाण केलं होतं. त्यांच्यापकी १८४९ साली सुरू झालेलं ‘लिलिव्हाइट्स गाइड टू क्रिकेटर्स’ हे वार्षिक तर बर्या९पैकी लोकप्रियही होतं.

१८६४ मध्ये विस्डेन यांनी जगप्रसिद्ध ‘विस्डेन क्रिकेटर्स अल्मॅनॅक’ हे मॅगझिन प्रसिद्ध केले. आता त्याचे वेबसाइटमध्येही रुपांतर झाले आहे. विस्डेन नियतकालिकाच्या पहिल्या वर्षांच्या अंकात फक्त ११२ पानं होती. तसंच या नियतकालिकामध्ये नक्की काय छापायचं हे न कळल्यामुळे विस्डेननं त्यात वेगवेगळ्या प्रकारची माहिती खिचडीसारखी भरली होती. उदाहरणार्थ आदल्या वर्षीच्या सामन्याची वर्णनं छापलेल्या पानांवर मधूनच सुमारे ५० वर्षांपूर्वी खेळल्या गेलेल्या सामन्यांची माहिती मध्येच होती. याशिवाय खगोलशास्त्र, भूगोल, शेती, सूक्ष्मजीवशास्त्र, औषधशास्त्र, युद्ध, गाजलेले खटले अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा असंबद्ध भरणाही विस्डेनच्या नियतकालिकात होता! साहजिकच त्याचा फारसा काही खप झाला नाही. पण हळूहळू विस्डेननं आपल्या नियतकालिकाचा दर्जा सुधारला. १८६६ सालच्या अंकामध्ये त्यानं आधीच्या हंगामामधल्या सगळ्या महत्त्वाच्या सामन्यांचे धावफलक छापले होते. त्यानंतर खेळाडूंचा जन्म-मृत्यू यांचे तपशील, सामन्यांची वर्णनं, प्रत्येक कौंटी संघासाठीचे विक्रम अशा गोष्टी काही वर्षांमध्येच ‘विस्डेन’मध्ये झळकायला लागल्या. १८८४ साली विस्डेनचं निधन झालं तरी त्याच्यानंतरसुद्धा त्यानं सुरू केलेल्या नियतकालिकामध्ये खूप बदल होत गेले. १९०० सालापर्यंत सुमारे ५०० पानांपर्यंत पोहोचलेलं ‘विस्डेन’ १९५० सालापर्यंत १००० पानांवर गेलं!

ऑस्कर वाइल्डसारखी अजरामर वाक्यं बनवायचं कौशल्यही विस्डेनकडे होतं असं म्हणतात. या संदर्भात एक उदाहरण सांगितलं जातं. इंग्लंडहून जहाजानं अमेरिकेचा प्रवास करणारे बहुतेक सगळे जण अॅभटलांटिक समुद्र पहिल्यांदा बघितल्यावर थक्कच व्हायचे. पण १८५९ साली विस्डेनही अमेरिकेला जाऊन आला होता. त्यानं जहाजामधून अॅ टलांटिक समुद्र बघितला तेव्हा त्याला फारसं काही विशेष वाटलं नाही. क्रिकेटमधली उपमा देत ‘या उसळणाऱ्या खेळपट्टीवर जरा १० मिनिटं जड रोलर फिरवला पाहिजे, म्हणजे ती शांत होईल’ असं अॅयटलांटिक समुद्राकडे बघून विस्डेन म्हणाला होता! जॉन विस्डेन यांचे ५ एप्रिल १८८४ रोजी निधन झाले.

संदर्भ : विनोद गोरे

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..