ब्रिटिश कथाकार, कवी आणि कादंबरीकार व मोगली व जंगलबुकचे लेखक जोसेफ रडयार्ड किपलिंग यांचा जन्म ३० डिसेंबर १८६५ रोजी मुंबई येथे झाला. जोसेफ रडयार्ड किपलिंग हे रडयार्ड किपलिंग या नावानेच प्रसिद्ध होते. जोसेफ रडयार्ड किपलिंग हे पाच वर्षांचा झाल्यावर त्याला आई-वडिलांनी इंग्लंडला शिकण्यासाठी नेलं होतं. पुढे ते वयाच्या १८व्या वर्षी पुन्हा भारतात परतले आणि त्यांनी पत्रकारिता केली. भारतातलं ग्रामीण जीवन त्यांनी जवळून अनुभवलं होतं. कथेइतकंच त्या काळात त्याचं काव्यलेखनसुद्धा सुरू होतं आणि ‘गंगादीन’, ‘मंडाले’, ‘डॅनी डिव्हर’ या त्यांच्या ब्रिटिश राजवटीतल्या कविता चांगल्याच गाजल्या होत्या.
त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या कथाही गाजल्या होत्या. त्याची ‘दी जंगल बुक’, ‘दी सेकंड जंगल बुक’ आणि ‘किम’ ही पुस्तकं अफाट लोकप्रिय झाली. बच्चे कंपनीला प्रिय अशा मोगली आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या जंगलातल्या त्याच्या साथीदारांवर अनेक फिल्म्स, टीव्ही सीरिज बनल्या आणि लोकप्रिय झाल्या. त्यांना १९०७ सालचं साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं.
जस्ट सो स्टोरीज, रिकी टिक्की तावी, कॅप्टन्स करेजस, दी मॅन हू वुड बी किंग, प्लेन टेल्स फ्रॉम दी हिल्स, स्टॉकी अँड कंपनी, अंडर दी देवदार्स, तुमाई ऑफ दी एलिफंट्स अशी त्याची इतर अनेक पुस्तकं वाचकप्रिय आहेत. जोसेफ रडयार्ड किपलिंग यांचे १८ जानेवारी १९३६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट