पत्रकार, संपादक अरुण टिकेकर यांचा जन्म १ फेब्रुवारी १९४४ रोजी झाला.
लेखनाची आणिम अभ्यासाची परंपरा त्यांच्याकडे वारशाने आली होती. अरुण टिकेकरांचे आजोबा रामचंद्र विनायक टिकेकर हे लोकमान्य टिळकांच्या केसरीत धनुर्धारी या टोपणनावाने सदर लिहित. ते केसरीचे पहिले स्तंभलेखक असल्याचा उल्लेख डॉ.य.दि. फडके यांनी केला होता. टिकेकर यांचे काका श्रीपाद रामचंद्र टिकेकर हे मुसाफिर टोपणनावाने लिहीत तर वडील चिंतामण रामचंद्र टिकेकर हे दूत या टोपणनावाने लिहीत. कदाचित, त्यामुळेच सदरलेखन आणि टोपणनावे यात टिकेकरांना विशेष रस होता.
स्वतः अरुण टिकेकर हे दस्तुरखुद्द, टिचकीबहाद्दर अशा अनेक नावांनी सदरलेखन करीत असत. महाविद्यालयीन शिक्षण घेताना इंग्रजीत नाट्यसमीक्षा केल्यानंतर ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या संदर्भ विभागात रूजू झाले. ते टाइम्स ऑफ इंडियाच्या १५० वर्षांचा इतिहास लिहिण्याच्या कामगिरीवर होते.आणिू कालांतराने ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आले. पुढे ‘लोकसत्ता’चे संपादक झाले.
अरुण टिकेकर यांनी तारतम्य हे लोकसत्तेतील सदर वाचकप्रिय केले.
अरुण टिकेकर हे लोकसत्ता या दैनिक वृत्तपत्राचे ११ वर्षे संपादक होते. माधव गडकरी यांच्यानंतर टिकेकर या पदावर होते. नंतर ते लोकमत या वृत्तपत्रात गेले.
अरुण टिकेकर यांचे १९ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले.
Leave a Reply