पत्रकार निखील वागळे यांचा जन्म २३ एप्रिल १९५९ रोजी झाला.
आपल्या स्प्ष्टवक्तेपणामुळे निखील वागळे वादांच्या भोवऱ्या मध्ये अनेकदा अडकले असले, तरी त्यांची परखड मते सुज्ञ लोकांना स्पर्शुन जाणारी असल्यामुळे, महाराष्ट्रातील लोकप्रिय व सर्वपरिचीत पत्रकारांमध्ये त्यांची गणती केली जाते. या व्यवसायामध्ये उडी घेतल्यानंतर, वागळे यांनी पत्रकारितेच्या विवीध क्षेत्रांमध्ये काम करून त्यांच्यामधील पत्रकाराला रुजवले, फुलवले, अधिक आभ्यासशील व तडफदार बनवले. फ्री लान्स रायटर म्हणून हातात पहिल्यांदा लेखणी धरल्यानंतरची ते आतापर्यंतची त्यांची वाटचाल स्वप्नवत अशीच राहिली आहे. तेव्हा त्यांनी हातात धरलेली लेखणी, आजपर्यंत अव्याहतपणे व बेधडकपणे आपला संदेश व समाजिक तळमळ विवीध स्तरांमधल्या जनतेच्या हृद्यावर उमटवित आहे. निखिल वागळे यांनी आपली पत्रकारिता १९७७ मध्ये सुरु केली कारकिर्दीच्या अगदी सुरूवातीला ‘दिनांक’ नावाच्या मराठी वृत्त साप्ताहिकाच्या संपादकपदी त्यांची निवड झाली. किर्लोस्कर प्रकाशन गटाच्या युथ या साप्ताहिकाचे संपादक मणून काम करीत असताना त्यांच्यातील पत्रकार खर्याक अर्थाने घडत गेला. त्यानंतर या क्षेत्रातील पुरेसे बाळकडु मिळाल्यानंतर त्यांनी त्यांची स्वतःची प्रकाशन संस्था स्थापन केली. १९८३ मध्ये त्यांनी ‘षटकार’ नावाचं स्पोर्ट्स मॅगेझीन सुरु केले त्यावेळी त्याचे संपादक संदीप पाटील होते. या स्पोर्ट्स मॅगेझीन नंतर निखिल वागळे यांनी फिल्म मॅगेझीन ‘चंदेरी’ सुरु केले त्याच्या पहिल्या संपादिका रोहिणी हट्टंगडी आणि नंतर गौतम राजाध्यक्ष हे होते.
अक्षर प्रकाशनचा यशस्वी व विशाल डोलारा सांभाळता सांभाळता एकीकडे त्यांचे, मुलाखती घेणे, विवीध कार्यक्रमांचे सुत्रसंचालन करणे, राजकारण, समाजकारण व धर्मकारण या त्यांच्या विशेष जिव्हाळ्याच्या विषयांवर जळजळीत लेखन करणे असे बहुआयामी कार्य चालुच होते. महानगर, षटकार, चंदेरी अशी अनेक वृत्तपत्रे, व आकर्षक मासिके त्यांनी सुरू करून, नियमीत वाचनाची आवड तरूणांच्यात रूजवली. पत्रकार म्हणून त्यांचा आलेख बघितला तर अशी दुर्मिळ गोष्ट असेल जी त्यांच्या लेखणीपासून सुटली असेल. विवीध टेलिव्हीजन कार्यक्रमांचे निवेदक म्हणून ते प्रसिध्द आहेत. २००४ मध्ये पुन्हा एकदा त्यावेळचे कट्टर शिवसैनिक नारायण राणे यांच्या वरील वक्तव्यामुळे निखिल वागळे यांच्यावर शिवसैनीकांनी हल्ला केला आणि यावेळी त्यांच्या तोंडाला काळे देखील फासले होते. वागळे यांनी प्रकाशक म्हणून ८० हून अधिक पुस्तकांची निर्मिती केली आहे.
दिलखुलास बोलणं व हजरजबाबीपणामुळे त्यांना सर्वोत्कृष्ठ निवेदकाचे अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. अनेक राष्ट्रिय व राज्य पातळीवरचे मानाचे पुरस्कार प्राप्त झालेल्या व भारतातले सर्वात तरूण संपादक या बिरूदाने वाखाणले गेलेल्या कलंदराला, संवेदनशील लेखक म्हणूनही पसंतीची पावती मिळाली आहे.
निखिल वागळे यांचा टीव्ही वरील वावर तसा १९८९ मधेच सुरु झाला होता त्यांनी दूरदर्शन मधून आपल्या एक सामाजिक – राजकीय विश्लेषक म्हणून ठसा उमटवला होता. ते आमने – सामने या कार्यक्रमाचे अँकर देखील होते.
२००७ साली निखिल वागळे हे नेटवर्क १८ च्या IBN लोकमत या चॅनलचे संपादक झाले. २००७ ते २०१४ पर्यंत निखिल वागळे यांनी चॅनेल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक वादग्रस्त मुद्द्यांना हात घातला. या दरम्यान त्यांचा ‘आजचा सवाल’ हा डिबेट शो त्यांच्या आक्रमक पणामुळे चांगलाच चर्चेत राहिला पण त्यांची ही आक्रमकता कधी कधी उद्धट रूप धारण करते असा आरोप सुद्धा त्यांच्यावर होत राहिला. याच दरम्यान मान्यवरांशी दिलखुलास गप्पांचा आणि थेट प्रश्नाचा त्यांचा ‘ग्रेट भेट’ हा शो सुद्धा खूप गाजत होता. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर निखिल वागळे यांनी IBN लोकमत चा राजीनामा दिला. IBN लोकमत च्या संपादकीय टीमचा भाग म्हणून संस्कृती पुरस्कार देखील त्यांना मिळाला.
IBN लोकमत सोडल्यानंतर निखिल वागळे हे महाराष्ट्र १ या चॅनलचे संपादक झाले. निखिल वागळे यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये महाराष्ट्र १ ला सुद्धा रामराम ठोकला त्यांनंतर २०१७ पासून निखिल वागळेंचा ‘सडेतोड’ प्रवास सुरु झाला तो TV ९ वर पण तो सुध्दा बंद करुन ते Max Maharashtra वर दिसतात.
Leave a Reply