दूरदर्शन आणि एनडीटीव्हीसारख्या वृत्त वाहिन्यामध्ये काम केलेले आणि हिंदी पत्रकारितेत आपला ठसा उमटवणारे वरिष्ठ पत्रकार विनोद दुवा यांचा जन्म ११ मार्च १९५४ रोजी झाला.
हिंदी पत्रकारितेतील बहुचर्चित नाव म्हणून विनोद दुवा यांच्याकडे पाहिलं जातं असे. अमोघ वक्तृत्व शैली, अचूक विश्लेषण आणि मुद्देसूद मांडणी यामुळे आजही त्यांचे विश्लेषणात्मक कार्यक्रम आवर्जुन पाहिले जातात. त्यांनी दूरदर्शन आणि एनडीटीव्ही सारख्या वृत्त वाहिन्यांमध्ये राजकीय विश्लेषण केलं आहे.१९९१मध्ये प्रसार भारतीवर त्यांनी निवडणुकांचं विश्लेषणही केलं होतं.
विनोद दुवा यांना भारत सरकारने २००८ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले होतं.
सर्वसामान्य नागरिकांच्या न्यायासाठी आणि हक्कांसाठी त्यांनी नेहमी आवाज उचलला, याशिवाय सरकारच्या चुकीच्या कामाबद्दल त्यांना धारेवरही धरलं.
त्यानंतर बराच काळ त्यांनी ‘जन गन मनकी बात’ या युट्यूबवरील कार्यक्रमातूही सद्यस्थितीतील विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आणि निर्भिडपणे आपलं मत मांडलं. याशिवाय ‘द वायर’ सारख्या वृत्त संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांनी आपलं पत्रकारितेचं काम सुरूच ठेवलं होतं.
विनोद दुवा हे एनडीटीव्हीमध्ये असताना त्यांनी जायका इंडिया का या क्रार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विविध ठिकाणची खाद्यभ्रमंती घडवली. त्यांच्या कार्यक्रमाची खासियत म्हणजे एखाद्या ठिकाणच्या खाद्यपदार्थाबद्दल सांगताना ते तेथील भौगोलिक परिस्थिती, संस्कृती याचीही ओळख करून देत होते. आजही जायका इंडिया का याचे कार्यक्रम यूट्यूबवर पाहिले जातात.
काही वर्षांपूर्वी Me Too प्रकरणातही त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. विनोद दुवा यांची पत्नी पद्मावती चिन्ना दुवा यांचं जून महिन्यात त्यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यानंतर विनोद दुवा खचले होते.
विनोद दुआ यांचे ४ डिसेंबर २०२१ निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply