……. आठवणीला उजाळा देणारा हा लेख……।
मंडळी ही आठवण आहे 1984 सालाची त्यावेळी मी रेल्वे स्टेशन ताकारी येथे रेल्वेत काम करीत होतो. किर्लोस्कर वाडी ला एक माणूस कमी पडला म्हणून मला आमचे रेल्वे स्टेशन मास्तर शि.वी. देसाई यांनी किर्लोस्कर वाडी येथे एक महिना रेल्वे कामासाठी पाठविले होते. रेल्वे स्टेशनवर सायंकाळी पाच नंतर वयस्कर माणसे फिरायला येत होती. या वयस्कर माणसांपैकी काळी टोपी घातलेला पांढरे शुभ्र धोतर नेसलेला व पांढरा शुभ्र सदरा घातलेला एक माणूस रेल्वे बाकावर बसला होता. हा माणूस रोज बसाय येतो हे मी पाहत होतो. मिया माणसाजवळ गेलो आणि त्याच्या जवळ बसलो इकडची तिकडची चर्चा झाली. आणि वर्तमान पत्राचा विषय निघाला त्या माणसाला मी म्हणालो मीसुद्धा वर्तमानपत्राला बातम्या कथा लेख असे लेखन पाठवत असतो. मी त्या व्यक्तीला म्हणालो आपले नाव काय ती व्यक्ती म्हणाली. माझे नाव द. रा. गोळे आहे मीसुद्धा अग्रदूत नव संदेश या वर्तमानपत्रा त बातम्या लिहीत असतो. हे ऐकून मला फार आनंद झाला मीही पत्रकार आहे तेथून माझी व गोळे सरांची चांगली ओळख झाली. ते रोज सायंकाळी पाच वाजता किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन वर फिराय यायचे व ठरलेल्या बाकावर बसाय चे त्यांच्यासोबत अजून एक वयस्कर म्हातारा असायचा मी म्हणालो तुम्ही कुठे राहता. गोळे म्हणाले आमच्या दोघांची मुले किर्लोस्कर कारखान्यात कामाला आहेत यांचा मुलगा अकाउंट क्लार्क आहे. व माझा मुलगा कारखान्यात राधाबाई किर्लोस्कर हॉस्पिटल मध्ये एमडी डॉक्टर आहे. मी गोळे सर यांना म्हणालो तुम्ही वर्तमानपत्रातून बातम्या पाठवता हे खरे आहे. पण तुम्ही बातम्या गोळा कसे करता मला गोळे म्हणाले मी सायकल वरून पलूस सावंतपूर किर्लोस्कर कारखाना या परिसरातील बातम्या गोळा करून वर्तमानपत्राला पाठवीत असतो. हे ऐकून या वयस्कर माणसाच मला फार कौतुक वाटलं वयस्कर व्यक्ती सायकलीवरून बातम्या गोळा करून वर्तमानपत्रात पाठवते याचे आश्चर्य तरी वाट लेच. या माणसाला सामाजिक कार्याबद्दल किती मोठा आदर आहे यांचे वय फार झाले आहे तरी पण सामाजिक कार्य करण्याची धडपड मला फार विशेष वाटत होती..।
..। मी त्यांना सहज म्हणालो तुमचे वय फार झाले आहे व वर्तमानपत्र वाले तुम्हाला या कामाबाबत काय देतात. गोळे सर म्हणाले मी पैशासाठी करत नाही मला वर्तमान पत्रा बद्दल फार अभिमान आहे. मी माझा छंद म्हणून हे काम करतो आणि वर्तमान पत्राचे संपादक मी पाठवलेल्या साऱ्या बातम्या अग्रदूत व नवसदेश या वर्तमानपत्रांतून प्रकाशित करत असतात. याचा आनंद मला फार वाटतो मी पैशासाठी काम करत नाही माझा मुलगा मोठा डॉक्टर आहे मी आत्ताच सांगितले हे ऐकून मला आनंद झाला खरे पण या मोबदल्यात गोळे सरांना काहीतरी मानधन म्हणून मिळाले पाहिजे. समाजसेवेचा वसा आणि वारसा गोळे सरांनी भेटला आहे असे माझ्या मनाला वाटू लागल. वर्तमानपत्र हे समाजाचे मुखपृष्ट आहे बातमी चांगली आली तर पत्रकाराला शब्बास की मिळते बातमी वाईट आली तर पत्रकाराला मार मिळतो. हे मला माहित आहे तरी पण समाजसेवेचे काम द. रा. गोळे करीत आहेत याचे मला फार आश्चर्य वाटत होते ही दोन म्हातारी माणसे किर्लोस्करवाडी स्टेशनला बसाय येत होती त्यांची माझी चांगली ओळख झाली होती। रोज माझी व त्यांची वर्तमानपत्र बातमी आणि पत्रकार या विषयावर चर्चा होत होती..।
..। मंडळी हल्लीचा पेपर तुम्ही वाच त असाल व पूर्वीचा पेपर यामध्ये भयंकर फरक आहे हे हे मान्य करावे लागेल. त्यावेळी सायकलीवरून बातम्या गोळा करणारा बातमी दार गोळे आणि आत्ताचे बातमीदार स्वतःला पत्रकार म्हणून मिरवणारे ही फार मोठी तफावत आहे. हल्ली च्या बातम्या वाचल्या की मनात प्रश्न निर्माण होतो बऱ्याच बातम्या पोलिसांच्या सांगण्यावरून असे छापले जाते. बातमीदार पत्रकार त्या घटना च्या वेळी तिथे नसतात काय सांगतात यावरून बातमी तयार करून वर्तमानपत्रात प्रकाशित करतात. यांना काय म्हणावे हल्ली अशा बातम्यातून समाजाने नक्की काय घ्यायच हा प्रश्न निर्माण होतो। हल्लीच्या बातम्या इतक्या सखोल होत नाहीत बातमीचा शेवटी पोलिसांच्या सांगण्यावरून असे वाचनात येते. पण आमचे गोळे सायकलीवरून घटनास्थळी जाऊन बातमी तयार करून वर्तमानपत्रात पाठवतात. हा सारा विषय माझ्या डोक्यात आला आणि मी गोळे सरांना म्हणालो उद्या आमच्या घरी या मी लिहिलेल्या बातम्या व प्रकाशित झालेल्या कथा तुम्हाला दाखवतो. हे ऐकून गोळे सर यांना फार आनंद झाला…।
… बातमीदार गोळे सर मला म्हणाले आपण कुठे राहता मी म्हणालो जुळेवाडी येथे राहतो. मला आमच्या गावात व परिसरात नाना म्हणून ओळखतात भिलवडी रेल्वे स्टेशन ला आल्यानंतर. दक्षिणेला रेल्वेच्या कडेने रस्ता आहे तो रस्ता धरून सरळ पुढे या इथे एक रेल्वे गेट लागेल. रेल्वे गेट बुरुंगवाडी व जुळेवाडी यामध्ये आहे या रेल्वे गेट मधून एक रस्ता बुरुंगवाडी या गावाला गेला आहे व दुसरा रस्ता येळावी बाजूला आहे तो रस्ता धरून जरा पुढे या तिथे तुम्हाला मराठी शाळा दिसेल. हिच ती जुळेवाडी मध्ये मिलिंद निवास हा साधा बोर्ड माझ्या घरासमोर मी लिहून एका तगडवर ठेवला आहे. तुम्ही जरूर या एवढ्या माहिती बातमीदार द. रा. गोळे माझ्या गावी आले आणि माझी चौकशी करू लागले. मराठी शाळे पुढे त्यांना खोताचा यशवंता अण्णा भेटला त्यांच्याजवळ चौकशी केली. अण्णा त्यांना म्हणाले मुलींची निवास या गावात कुठे नाही यावर गोळे म्हणाले तो पोरगा रेल्वेत कामाला आहे. बातमीदार आहे शिवाय कथा लेख वर्तमान पत्रातून लिहितो यावर अण्णा म्हणाले आमच्या गावात एक दत्ता मानगुडे व दुसरा संभाजी कोकाटे ही दोन पोर काहीतरी लिहितात एवढे मला माहित आहे. तुम्हाला नाव सांगितले नाही का यावर गोळे म्हणाले मी त्या पोराच नाव विसरून गेलो मग हा पोरगा कुठे सापडायचा यावर यशवंत अण्णा म्हणाले. माझ्या सुद्धा लवकर लक्षात यायला तयार नाही तुम्ही एक काम करा. याच रस्त्याने नीट पुढे जावा व पुढे मानुगडे ही चाळ लागेल तुम्हाला तिथे माहिती मिळेल. पण आमच्या गावात मिलिंद निवास हे घर कुठे सुद्धा नाही या गावात एकदम साधी घर आहेत कुंभारी कवला ची. आमच्या गावात कोणाच्या सुद्धा घरापुढे बोर्ड नाही. पण पुढे चौकशी करा अण्णा म्हणाले..।
… अण्णांचे ऐकून गोळे सर आमच्या गावातून दुपारपर्यंत फिरले पण त्यांना माझ घर सापडली नाही. मी त्यांना आमच्या घरी यायला सांगितले होते हे खरे आहे पण हा विषय माझ्या लक्षा तुं न निघून गेला होता. मी माझ्या घरासमोर बाईक तगडवर लहान अक्षरात मिलिंद निवास असे लिहिले होते पण गोळे सरांना ही लहान अक्षरे दिसली नाहीत. म्हणून ते दुपारपर्यंत माझे घर व मला शोधत होते गोळेसर आमच्या गावच्या पाण्याच्या आडाजवळगेले. यांना आनंदा खोत भेटला गोळे यांनी परत या माणसाजवळ चौकशी केली घरातील पाणी संपले म्हणून मी आडावर पाणी आणायला गेलो असता. मला गोळे सर दिसले पुन्हा माझ्या लक्षात आले हा वयस्कर म्हातारा. याला मी मी यायला सांगितले खरे पण हा विषय मी विसरून गेलो होतो. हा म्हातारा दिलेल्या शब्दाला जागणारा आहे हे माझ्या चटकन लक्षात आले आनंदा खोत म्हणाले तुम्ही म्हणत होता तो च हा मुलगा आहे. मी गोळे यांना पाहून नमस्कार घातला ते मला म्हणाले दुपार झाली पण तुझे घर सापडत नाही मी भयंकर फिरलो. मिलिंद निवास हा बोर्ड मला कुठे सुद्धा दिसला नाही यावर मी मनातल्या मनात हसू लागलो आणि त्यांना घरी घेऊन गेलो. त्यांना मी माझे वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले साहित्य दाखवले चहा पाणी झाला माझे साहित्य पाहून त्यांना फार आनंद झाला. व गोळे सर दुपारच्या गाडीने किर्लोस्करवाडी ला गेली पण असा हाडाचा प्रामाणिक पत्रकार वयाने वयस्कर असणारी व्यक्ती नेहमी माझ्या लक्षात राहणारी अशी आहे. माझे घर त्यांना सापडले नाही कारण मिलिंद निवास हा साधा बोर्ड बारीक अक्षरात कुणाला सुद्धा वाचता येणार नाही असा होता. गोळे सर यांना हा लहान लेकराचा बोर्ड कसा वाजता येणार पण किर्लोस्करवाडी परिसरातील सायकलीवरून बातम्या गोळा करणारा पत्रकार द. रा. गोळे यांचं नाव अजून माझ्या तोंडात येते धन्यवाद मंडळी…।
-–दत्तात्रय पांडुरंग मानुगडे
Leave a Reply