अबोलतेच्या आठवणींनी,
भरलं होतं जुनं घर…..
गाई गुऱ्हांच्या आस्तित्वात,
फुललं होतं द्वार…..
चतुर बंधूंच्या नात्याला,
कष्टाची होती धार…..
माणुसकीच्या- जुन्या काळात,
इथं सुख होती दूर……
काळ्या मातीतल्या धान्यांन,
भरलं होतं जुनं घर……
कष्ट होतं भरपूर,
पण- “गरीबी होती फार”…..
दोन बंधूच्या वाटणीनं,
बदललं पारं द्वार
आजोबा व वडिलांच्या माझ्या-कष्टाची,
आठवण येतं आहे फार…..
नाही राहिलं माझं,
गरिबाचं जुनं घर…….
— गजानन साताप्पा मोहिते