कावळ्याचे नवे फेसबुक
भलतेच आले बघा रंगात
रोजरोज न जाता शाळेत
शिका म्हणे नेटच्या घरात
कोल्होबाचे व्हॉट्सऍप
करते करामती भारी
जंगलातील बित्तंबातमी
येते लगेच स्क्रीनवरी
सिंहाचे यूट्यूब चॅनल
सबस्क्राईब करा म्हणे
जंगली कविता म्हणतो
लाईक्स वाढवा म्हणे
सारा सोशल मिडिया
जंगलात शिरला आहे
म्हातारीचा मोबाईल
वाघानंं पळवला आहे!
जंगलातील शांतता
मोबाईलने भंगली
कोल्हेकुई,डरकाळी
नेटवर्कने थांबली!
— विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
सं. ९४२१४४२९९५
Leave a Reply