नवीन लेखन...

जुन्या गोष्टी नवे बदल (राष्ट्रीय कॅलेंडर)

इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर आपण नवे बदल केले आणि ते स्वीकारले. १२ पै म्हणजे १ आणा आणि १६ आणे म्हणजे एक रुपया असा हिशोब आपण १९५७ सालच्या ३१ मार्चपर्यंत करीत होतो. पण १ एप्रिल १९५७ पासून आणे आपण बाद केले. पैसे आणि रुपये हे दोनच उरले. १०० पैसे म्हणजे एक रुपया असे प्रचलित झाले. ५० पैसे हा अर्धा रुपया. हे समजते पण ८ आणे म्हणजे अर्धा रुपया ही भाषा आता स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पिढीला समजत नाही. चलनाप्रमाणेच आपण लांबी, अंतर मोजण्याची, वजनाची मापे बदलली. नवीन दशमान पद्धतीचा आपण स्वीकार केला. आता तो सगळ्यांचा अंगवळणी पडला आहे. बदल स्वीकारणे आणि तो अंगवळणी पडणं ही गोष्ट होऊ शकते. चलन आणि मापातील बदल हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

राष्ट्रीय कॅलेंडरचा स्वीकार
वजन मापे याप्रमाणे नवीन कॅलेंडरचाही २२ मार्च १९५७ पासून आपण स्विकार केला. मात्र जनमानसात ते प्रचलित होण्याच्या दृष्टीने शासकीय पातळीवर कोणतेही ठोस प्रयत्न न झाल्यामुळे राष्ट्रीय कॅलेंडर सुटसुटीत आणि शास्त्रीय असूनही लोक व्यवहारापासून दूर राहिले. इतका दीर्घकाळ गेल्यामुळे असंख्य लोकांना असं काही कॅलेंडर आहे हेच माहीत नाही. त्यामुळे ते वापरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरची ही उपेक्षा आपण किती काळ सहन करणार ? सरकारने ते करावं असं नुसतं म्हणून चालणार नाही. जनतेकडून यासंबंधीची चळवळ उभी राहिली तरच या कॅलेंडरचे अस्तित्व राहील. अन्यथा कागदोपत्री असलेले हे अस्तित्वदेखील काळाच्या ओघात नाहीसं होईल की, काय असे वाटते.

— हेमंत मोने 

2 Comments on जुन्या गोष्टी नवे बदल (राष्ट्रीय कॅलेंडर)

  1. शक संवत या नांवानें राष्ट्रीय कॅलेंडर आणलें गेलें आहे. लोकांच्या महितीसाठी त्याचे कांहीं महत्वाचे डीटेल्स् दिले असते तर बरें झालें असतें.
    – सुभाष स नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..