नवीन लेखन...

जुन्यातील चांदोबा पुस्तक

… मी लहान होतो तेव्हा चांदोबा या पुस्तकाचा अगदी जवळचा वाचक होतो. त्यावेळी वर्तमानपत्रांची संख्या फार कमी होती ठराविक मासिके ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये वाचाव्यास मिळत होते. वाचनालये शहराच्या ठिकाणी होती शिवाय करमणुकीची साधने सुद्धा अतिशय कमी होती. गावामध्ये काही लोकांच्या घरात हरकुलस कंपनीची सायकल असायचे ठराविक लोकांच्या घरात रेडिओ असायचा. ज्याच्या घरामध्ये रेडिओ आहे त्याला गावामध्ये श्रीमंत माणूस आहे असे लोक समजायचे. साधने कमी होती परंतु माणसाच्या मनामध्ये एकमेकांविषयी अतिशय प्रेम होते. बाहेर गावचा माणूस एखाद्या वेळी पाहुणा म्हणून आला तर त्याचे जंगी स्वागत व्हायचे. बाहेरचा पाहुणा आल्यामुळे जिव्हाळा प्रेम व घर भरल्यासारखे प्रत्येकाच्या मनाला वाटत असे. त्यावेळी ची माणसे व आत्ताची माणसे यामध्ये भरपूर फरक झालेला दिसून येतो. सध्या तर शेतीच्या वाटपावरून भाऊ भावाचा वैरी झाला आहे अशी ही नवीन पिढी पोलीस स्टेशनमध्ये अजूनही सळ्या मोजत आहेत. केस करणारा व केस घेणारा ही दोन्ही माणसे मेली तरी शेतीचा निकाल लागला नाही. अशी कितीतरी उदाहरणे मी डोळ्यांनी पाहिली आहेत….।

… सध्या तर काही माणसांची बुद्धी मतिमंद झाली आहे आपला कोण दुसऱ्याचा कोण हे ओळखणे कठीण झाले आहे. जुन्या रूढी पद्धती दिवसां दिवस कमी होत चालल्या आहेत एकमेकांवर प्रेम करणारी माणसं निघून गेली परंतु चांगली शिकवणार याची संख्या हल्ली फारच कमी झाली आहे असे एकंदरीत जाणवते. दुसऱ्याचे वाईट कसे होईल याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे असा हा कलियुगातील करमत स्वभावाचा माणूस. दिसून येत आहे याचीच मनाला खंत वाटते आमच्या वेळी मानसी तर प्रेमळ होतीच परंतु एकमेकांविषयी आदर फार मोठा होता. हे चांदोबाची पुस्तक बरेच काही सांगून जाते भले मी म्हणतो यातील कथा काल्पनिक असतील. परंतु याच कल्पनेतून भयंकर मोठे ज्ञान होते म्हणून असे पुस्तक त्यावेळी राहून राहून मी वाचत असे. कल्पकता विषय असल्याशिवाय माझा येत नाही गंभीर कथा किंवा कादंबरी जास्त कोण वाचत नाही. त्याच्यासाठी कल्पनेची काही वेळा झालर ही लावावी लागते या पुस्तकातील रंगीबेरंगी बोलकी चित्रे मनाला बरंच काही सांगून जातात. आणि चित्रावरूनच एखादी कथा जन्म घेते हे वेगळे सांगण्याची गरज नाही…..।

…. पूर्वी ग्रामीण भागामध्ये वाचण्यासारखे तसे काहीच नव्हते परंतु हा चांदोबा हातात आला म्हणजे. मला फार आनंद व्हायचा हा चांदोबा शिरटेकर दादांच्या घरी महिन्याला पोस्टाने येत होता. चांदोबाची पार्सल कधी येते मी वाट पाहत आहे दादांच्या घरी शक्यतो चांदोबा कोणी वाचत नसे. पण मी मात्र आवडीने वाचतो म्हणून दादांनी मला एकदा सांगितले होते आम्हाला आमच्या कामामुळे चांदोबा वाचायला वेळ नाही. तुला वाचनाची आवड आहे तूच वाचत जा म्हणून मी आवडीने चांदोबा वाचत असे. त्या पुस्तकातील विशेष मला वेताळ राजाची गोष्ट आवडत असे ही गोष्ट वाचताना मला भीती वाटून अंगावर काटे सुद्धा येत होते. प्रत्येक वेळी विक्रमानादित्याला मेलेला माणूस नवीन गोष्ट सांगत होता गोष्ट जुनीच होती पण मनाला भावून जात होती. प्रत्येक वेळी विक्रमादित्य राजा मेलेले प्रेत स्वतःच्या खांद्यावर घेऊन पुढे पुढे जात असे. आणि ते प्रेत राजाला गोष्ट सांगत असे हा जो सीन आहे तो स्मशानभूमीतला आहे असे वाचताना जाणवते. झाडाच्या खाली मयत झालेले प्रेत व झाडाच्या फांदीवर बसलेली भुते हे पाहिले की भीती वाटल्याशिवाय राहणार नाही. वेताळाची गोष्ट वाचताना भीती तर वाटतेच परंतु पुढे काय याची उत्सुकता मनाला राहिल्याशिवाय राहत नाही हेच खरे……।

….. या पृथ्वीवर खरच भूत आहे का याचा अंदाज बांधणे कठीण आहे काही लोक म्हणतात भूत आहे तर काही लोक म्हणतात भूत दिसत नाही मग आहे कसे म्हणायचे. हा एक वादाचा प्रश्न आहे हे दिसते ते वास्तव आहे गुरु भक्ती करणाऱ्या माणसांना भूत दिसते असा काही माणसांचा समज आहे. प्रत्येक महिन्याला चांदोबा वेगवेगळी गोष्ट घेऊन पोस्टातून येत होता. पुस्तकाच्या वरील रंगीत सुंदर चित्र व आतील रंगीत चित्रे यामुळे चांदोबा हे पुस्तक अतिशय उठावदार असे दिसत होते. मृत आत्म्यात घुसलेला वेताळ जणू प्रत्येक माणसांची प्रत्येक वेळी एक गोष्ट सांगत होता. या गोष्टीतून पुष्कळ विचार घेण्यासारखे होते माणसाच्या जीवनातील सार कळत होते माणसाने कसे वागावे व कसे बोलावे याचा सुद्धा बोध या कथेतून होत होता. कथा काल्पनिक असली तरी वाचकाला एक दिशा देणारी अशी होती म्हणून पूर्वीचे चांदोबा हे पुस्तक मला फार आवडत असे. आता ही पुस्तके बंद झाली आहेत मार्केटमध्ये नवीन नवीन पुस्तके येत आहेत परंतु जुन्या पुस्तकासारखी सर नवीन पुस्तके करीत नाहीत एवढे मात्र निश्चित….।

…. जग हे बारा भानगडी चाहे आणि या जगातील माणसे सुद्धा त्याच पद्धतीची आहेत. दुसऱ्याचे अगोदर चांगले व्हावे नंतर माझे चांगले व्हावे ही पूर्वी लोक म्हणत असे. पण आता सध्या असे कोणीही म्हणत नाही आपलीच घोडे पुढे कसेदामटायचे या विचारात ही मंडळी असते. अशी ही मंडळी वागते त्याला आपण माणूस म्हणायचं का हा प्रश्न नेहमी मनाला पडतो. माणसाचा स्वार्थ नक्की कुठे व कशात आहे हा विचार हल्लीचा माणूस करत असतो. रात्री उगवणारा चांद सर्वांना शितल प्रकाश देतो आणि या शितल प्रकाशामध्ये एक प्रकारचा आनंद तर रडत असतो. झाडावरची सळसळणारी पाणे चंद्राच्या शीतल प्रकाशात एक प्रकारचा आनंद घेतात शांत वातावरणामध्ये. झाडावरच्या पक्षाची चालू असलेली धडपड आणि निशब्द वातावरण खोलवर मनात रुजल्याशिवाय राहत नाही एवढे मात्र निश्चित. चंद्र हा प्रेमळ आहे अंधाऱ्या रात्री प्रत्येकाला शितल प्रकाश देतो आणि रात्रीच्या वेळी संपूर्ण वातावरण आनंदी करून सोडतो. याच्याशिवाय दुसरा आनंद कोणता मोठा असू शकतो प्रत्येक माणसाने आलेल्या संकटाला तोंड देऊन पुढे चालले पाहिजे. प्रत्येकाला प्रेम दिले पाहिजे प्रत्येकाशी गोड बोलले पाहिजे हाच खरा माणुसकीचा धर्म आहे असे मला वाटते….।
…….. पूर्णविराम…..।

–दत्तात्रय मानुगडे,
ग्रामीण कथा लेखक.

Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 30 Articles
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..