नवीन लेखन...

जेष्ठ नागरिकांचा साथी – जेष्ठमध

आपल्या भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाचे महत्व खूप आहे. चरक, भृगु, सुश्रुत इत्यादी प्राचीन ऋषी मुनींनी ह्यात योगदान दिलेले आहे. असे म्हणतात की या पृथ्वीवर अशी एकही वनस्पती नाही की त्याचा कोणताही औषधी उपयौग नाही. आयुर्वेदिक औषधोपचार हे जेष्ठ नागरिक व लहान मुलामद्धे खूपच असरदार असतात.

आज आपण अशाच एका वनस्पती ची माहिती घेणार आहोत. याचे नाव जेष्ठमध आहे. याचे शास्त्रीय नाव Glycerriza glauca असे आहे. ही साधारणपणे एक ते दोन फूट उंचीची वनस्पती fabaceae कुळातील आहे. याचे मूळ (root) खूपच औषधी असते.

ज्येष्ठमध हे मुलेठी, लिकोराईस या नावाने देखील ओळखले जाते. ज्येष्ठमध (अन्य मराठी नावे: यष्टिमधु) ही दक्षिण युरोपात व आशियात आढळणारी कडधान्यवर्गीय वनस्पती आहे. हिच्या मुळांपासून गोडसर चवीचा अर्क मिळतो.
जेष्ठमधआरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. जेष्ठमध साधारणतः पावडर, मूळ (रूट्स) या स्वरुपात वापरली जाते आयुर्वेदात याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. ज्येष्ठमध खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक रोगांवर मात करण्यासाठी जेष्ठमध गुणकारी आहे. यात प्रोटीन्स, अँटीबायोटिक्स आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. तसेच यात कॅल्शियम देखील असते. त्यामुळे अनेकदा सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्यास घरातील वडीलधारी माणसं जेष्ठमध खाण्याचा सल्ला देतात.

ज्येष्ठमध हे बहुगुणी औषध असून त्याचा वापर पित्तनाशक म्हणून देखील केला जातो. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बुद्धी देखील तेजस्वी बनते. ज्येष्ठमध वात आणि कफच्या समस्येवर देखील उपयुक्त आहे. परंतु जेष्ठमधाचा मर्यादित प्रमाणातच वापर केल्यास फायदा होतो, त्याचा अतिवापर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. रस- मधूर गुण- गुरू, स्निग्ध विपाक- मधूर वीर्य- शीत प्रकृतीचे आहे.

ज्येष्ठमध हे अत्यंत गुणकारी औषध असून महिलांसाठी वरदान आहे. ज्येष्ठमधाचे फायदे अनेक आहेत. तुम्ही ज्येष्ठमध पावडर वापरू शकता. ज्येष्ठमध खाण्याचे फायदे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहे. केवळ शारीरिक नाही तर ज्येष्ठमधाचे तुमच्या त्वचेसाठीही फायदे होतात. ज्येष्ठमध असो वा ज्येष्ठमध पावडर फायदे दोन्हीचे आहेत. आपण नक्की आपल्यासाठी याचे काय आणि कसे फायदे होतात ते बघणार आहोत. पण त्याआधी ज्येष्ठमधाच्या किती पद्धती आहेत आणि ज्येष्ठमध म्हणजे नक्की काय ते जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण बऱ्याच जणांना ज्येष्ठमध म्हणजे नक्की काय आणि त्याचा फायदा कसा करून घेता येतो याची माहिती नाही.

ज्येष्ठमध हे दोन प्रकारचे असते. स्थलज आणि जलज.

जलज ज्येष्ठमध – याला मधुपर्णी असेही नाव आहे. हे ज्येष्ठमध दुर्मिळ असून फारच कमी ठिकाणी सापडते.
तर दुसरा प्रकार म्हणजे

स्थलज ज्येष्ठमध- हे बऱ्याच ठिकाणी सापडते. या दोन्हीचा उपयोग आपल्या आरोग्य आणि त्वचेसाठी आपल्याला करता येतो. मिसरी, अरबी, तुर्की हेदेखील प्रकार यामध्ये असतात. पण यामधील गोडी तुम्हाला वेळेनुसार कमी झालेली दिसून येते. ज्येष्ठमध

अनेक आजारांवर अतिशय गुणकारी मानले जाते. ज्येष्ठमध खाण्याचे अनेक फायदे  आहेत. यात प्रोटीन्स, अँटीपायोटिक्स, अँटिऑक्सिडंट आणि कॅल्शियम सारखे शरीरासाठी उपयुक्त असलेले गुणधर्म आढळतात.
ज्येष्ठमध हे हिंदीमध्ये मुलेठी या नावाने ओळखले जाते. बऱ्याच ठिकाणी याची ओळख याच नावाने आहे.
बघूया मग नक्की काय आहेत जेष्ठ मधाचे फायदे

ज्येष्ठमध खाण्याचे काय आहेत फायदे?

पित्त: ज्येष्ठमधाचा वापर पित्तनाशक म्हणून देकील केला जातो. कोणाला खूप अॅसिडीटीची (Acidity) समस्या जाणवत असेल तर तुम्ही त्यांना ज्येष्ठमधाच्या पावडरससोबत मध, तूप आणि आवळ्याचे चूर्ण मिक्स करून त्याचे चाटण खायला देऊ शकता. यामुळे अॅसिडीटीच्या समस्येपासून आराम मिळतो.

अतिसार : तुम्ही अतिसारमुळे (Diarrhea) त्रस्त असाल तर ज्येष्ठमध तुमच्या
साठी गुणकारी ठरू शकते. यासाठी ज्येष्ठमधसोबत खडीसाखर, जायफळ आणि डाळिंबाच्या सालीची पावडर यांचा काढा करून तुम्ही पिऊ शकता. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

ताप : तुम्हाला ताप (Fever) आला असेल तर तुम्ही घरगुती उपाय म्हणून ज्येष्ठमधाचा वापर करू शकता. अशा स्थितीत ज्येष्ठमधाच्या पावडरसोबत तुम्ही त्यात मनुके, मोहाचे फूल आणि त्रिफळा घालून वाटून बारीक करा आणि रात्रभर गरम पाण्यात भिजूवा. सकाळी हे पाणी प्या. यामुळे आराम मिळेल.

संधिवात: जेष्ठमधाचा अनेक रोगांवर फायदा होतो त्यापैकी एक म्हणजे संधिवात (Arthritis). जेष्ठमधात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट आणि अँटीबायोटिक गुणधर्म आढळतात. यामुळे संधिधिवाता सारख्या त्रासात वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.

घसा खवखवणे: जेष्ठमध घशासाठी रामबाण उपाय मानले जाते. तुम्हाला घशात (Throat Infection) खवखव होत असेल किंवा सर्दी, खोकला यासारखा त्रास होत असेल तर तुम्ही जेष्ठमधाचे खाऊ शकता. यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल.

डोळ्यांसाठी: ज्येष्ठमध डोळ्यांसाठी टॉनिकप्रमाणे काम करते. दृष्टी चांगली ठेवण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. यासाठी ज्येष्ठमधाच्या पावडरसोसोबत त्रिफळाचूर्ण, दूध आणि तूप एकत्र करून प्या. त्यामुळे तुमची दृष्टी चांगली राहण्यास मदत होईल.

ज्येष्ठमधाच्या रसाच्या सेवनाने स्वरभंग दूर होतो.
अशक्तपणा कमी करणारे म्हणजे शक्तिवर्धक असे हे ज्येष्ठमध चवीला गोडसर, पण कफ कमी करणारे बलवर्धक औषध आहे.

रुग्णास अशक्तपणा आला असल्यास ज्येष्ठमधाचा तुकडा बारीक कुटून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण,४ ग्राम मध किंवा तुपातून दुपारी व रात्री जेवणापूर्वी त्यास खाण्यास द्यावे.

मासिक पाळीचा त्रास:

हा प्रत्येक महिलेला होत असतो. त्यासाठी आपण बरेच इलाजही करत असतो. पण त्यामध्ये तुम्ही ज्येष्ठमधाचा वापर करून पाहा. तुम्ही ज्येष्ठमध पावडर, दूध, साखर, उडदाचे पीठ, मध हे सर्व एकत्र करून त्याचे सेवन करा. यामुळे मासिक पाळीचा त्रास सहन करण्यासाठी मदत मिळते. तसंच तुमचा त्रासही कमी होतो. थायरॉईडच्या समस्येवर देखील आराम पडतो.

जेष्ठमधाचे फायदे अनेकांना माहीत आहेत. हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदात याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. वास्तविक, जेष्ठमध अनेक रोग बरे करण्यासाठी प्रभावी आहे. त्यात विशेष प्रथिने, प्रतिजैविक, अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यात कॅल्शियम देखील असते. सर्दी, खोकला झाल्यास घरातील वडीलधारी मंडळी जेष्ठमध खाण्याचा सल्ला देतात. कारण या आजारांमध्ये जेष्ठमधाचा रस खूप फायदेशीर आहे. मात्र, जेष्ठमधाचा अतिवापर करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. जेष्ठमधाचा मर्यादित प्रमाणात वापर केल्यास फायदा होतो. असे काही आजार आहेत ज्यामध्ये जेष्ठमधाचे सेवन अजिबात करू नये. ज्यांना असे आजार आहेत त्यांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय जेष्ठमध खाणे टाळावे.

जेष्ठमधाचे कोणते फायदे आहेत आणि ते एखाद्या व्यक्तीला कसे हानीकारक ठरू शकते? जेष्ठमधाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सर्वसाधारणपणे, जेष्ठमध मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास शरीराला फायदा होतो, परंतु जर तुम्हाला उच्च रक्तदाब, साखर, मूत्रपिंड, हृदय किंवा यकृताशी संबंधित आजार आहेत, तर वैद्यकीय सल्ल्याशिवाय दारूचे सेवन करू नये. – जास्त प्रमाणात जेष्ठमधाचे सेवन केल्याने डोकेदुखी, स्नायू दुखणे, दीर्घकाळ थकवा येणे, सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या उद्भवू शकतात. जास्त प्रमाणात जेष्ठमध खाल्ल्याने शरीरात पोटॅशियमची कमतरता होऊ शकते. ज्या लोकांना लघवीच्या समस्या आहेत त्यांनीही याचे सेवन जाणीवपूर्वक टाळावे. जेष्ठमधाचे फायदे जाणून घ्या जेष्ठमधाचा अनेक रोगांवर फायदा होतो, त्यापैकी एक म्हणजे संधिवात. जेष्ठमधामध्ये अँटिऑक्सिडंट आणि अँटीबायोटिक गुणधर्म भरपूर असतात. ज्यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते. जेष्ठमध हे घशासाठी रामबाण औषध मानले जाते. जर तुम्हाला सर्दी किंवा खोकला होत असेल, घसा दुखत असेल तर जेष्ठमधाचे सेवन केल्याने खोकल्याचा, घशाचा त्रास कमी होतो. जर तुम्हाला डोळ्यांशी संबंधित समस्या असतील आणि डोळ्यात जळजळ होऊन डोळे लाल होत असतील तर यामध्ये जेष्ठमधाचा फायदा होतो. जेष्ठमधामध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात. त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यासोबतच जेष्ठमधाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तोंडातून दुर्गंधी येत असल्यास, जेष्ठमध वापरणे खूप फायदेशीर आहे. त्वचेच्या समस्यांवरही जेष्ठमध खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आढळतात.

1. ज्येष्ठमध कसे घ्यावे? किती प्रमाणात घ्यावे?

ज्येष्ठमध तुम्ही उगाळून अथवा पावडर स्वरूपातही घेऊ शकता. मध, त्रिफळाचूर्ण अथवा अन्य गोष्टींबरोबर हे तुम्हाला घेता येते. साधारण 3 ते 5 ग्रॅमपर्यंत तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. तसेच हे वापरताना तुम्हाला अन्य आयुर्वेदिक चूर्णांचाही उपयोग करून घेता येतो.

2. ज्येष्ठमधामुळे काही नुकसान होते का?
कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा नुकसानदायी ठरू शकतो. तसे तर ज्येष्ठमधाने काहीही नुकसान होत नाही. पण तुम्ही त्याचा अतिवापर करणे योग्य नाही. अन्यथा यामुळे तुमच्या त्वचेवर त्याचा अयोग्य परिणाम होण्याची शक्यता असते.

3. ज्येष्ठमधामध्ये कोणते घटक असतात?
ज्येष्ठमधामध्ये कॅल्शियम, ग्लिसारायजक अॅसिड, अँटिऑक्सिडंट्स, अँटिबायोटिक तत्व असतात. तसेच यामध्ये प्रथिनांचे प्रमाणही आहे.

4. जास्त प्रमाणात जेष्ठमधाचे सेवन केल्याने डोकेदुखी, स्नायू दुखणे, दीर्घकाळ थकवा येणे, सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या उद्भवू शकतात. जास्त प्रमाणात जेष्ठमध खाल्ल्याने शरीरात पोटॅशियमची कमतरता होऊ शकते. ज्या लोकांना लघवीच्या समस्या आहेत त्यांनीही याचे सेवन जाणीवपूर्वक टाळावे. लिकोरिसमध्ये अँटीव्हायरल, अँटीमाइक्रोबियल, अँटी-इंफ्लॅमेटरी प्रभाव असतो. जेष्ठमध मुळांच्याच्या फायद्यांमध्ये त्वचेची स्थिती आणि पेप्टिक अल्सर यांचा समावेश होतो. तुम्ही ते जेष्ठमध कॅप्सूल, गोळ्या आणि बरेच काही स्वरूपात घेऊ शकता
ज्येष्ठमध वनस्पती हे सर्वात जुने आणि लोकप्रिय हर्बल उपायांपैकी एक आहे. त्याची चव गोड असल्याने, ते पेये, कँडीज आणि विशिष्ट औषधांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.ज्येष्ठमध रूटउपचार करण्यासाठी वापरले जातेछातीत जळजळ, एक्जिमा आणि अल्सर. हे विविध स्वरूपात उपलब्ध आहे

जेष्ठमधाची लागवड खूप कमी प्रमाणात आहे व मागणी खूप आहे. त्यासाठी शास्त्रज्ञांनी उती संवर्धन पद्धतीने रोपे परिक्षा नळीत वाढवण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यामुळे भविष्य काळात जेष्ठमधाच्या मुळांची कमततरता जाणवणार नाही.
जेष्ठमध हे बटाट्यासारखे आहे. बटाटा जसा कोणत्याही भाजीत मिसळता येतो तसे जेष्ठमधाच्या चूर्णाबरोबर कोणतेही दुसरे चूर्ण घेता येते. हे कोमट पाण्याबरोबर घेतल्यास जास्त परिणामकारक ठरते त्यामुळे वैद्य हे चूर्ण कोमट दूध किंवा पाण्याबरोबर घेण्याचा सल्ला देतात.

अशारीतीने जेष्ठमध हे जेष्ठ नागरिकांची दुसरी काठीच आहे असे म्हणल्यास वावगे नाही.

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

१८/०३/२०२४
मोबा. ९८८१२०४९०४

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 78 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on जेष्ठ नागरिकांचा साथी – जेष्ठमध

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..