ह्याची जमिनीवर दाट पसरणारे व खुप उंच वाढणारी वेल असते.हिच्या फांद्यांवर पांढरे ठिपके असतात.ह्याची पाने अण्डाकार व दोन्हीकडे निमुळती व दन्तुर कडा असलेली असते.हिचे फुल हिरवं व मधुर सुवासाचे असते.पुष्प दंड ३-४ बोटे लांब असतो.ह्याचे फळ वाटाण्या सारखे दिसते.हे गोल,पिवळे व त्रिखण्ड असलेले असते.ह्याच्या प्रत्येक भागात एक त्रिकोणी केशरी रंगाची बी असते.हिच्या फळांचे घोस लाल,पिवळे व चमकदार असतात.
ज्योतिष्मती चवीला तिखट,कडू असून अतिउष्ण असते.तसेच हि प्रभावाने मेध्य असून तीक्ष्ण व स्निग्ध असते.ज्योतिष्मती चवीला कडू,तिखट व उष्ण तीक्ष्ण असल्याने कफनाशक आहे.तसेच स्निग्ध असल्याने वातनाशक आहे व पित्तकर आहे.
चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)ज्योतिष्मती वातनाशक व वेदना स्थापक असल्याने संधिवात,कंबरदुखी ह्या विकारामध्ये हिच्या तेलाने मालिश करतात.
२)पांढऱ्या कोडा मध्ये डागांवर ज्योतिष्मती तेल लावल्यास त्वचेचा रंग प्राकृत होण्यास मदत होते.
३)ज्योतिष्मती उष्ण गुणाने व प्रभावाने साधक पित्ताची वाढ करून मेध्य कार्य करते त्यामुळे ग्रहणशक्ती व स्मृती वाढते.
४)मासिकपाळी अनियमित असल्यास ज्योतिष्मती तेल दुधासोबत देतात.
५)खरजेवर ज्योतिष्मती बिया गोमुत्रात वाटून लावतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️ Dr Swati Anvekar
Leave a Reply