पूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत पंजाबी, बंगाली व हिंदी भाषिक संगीतकारांची मांदियाळी असताना वसंत देसाईंचा सन्माननीय अपवाद वगळता बहुसंख्य मराठी संगीतकारांनी इंग्रजी आद्याक्षरांचा आसरा घेत मराठीपण लपविण्याचा प्रयत्न केला. के. दत्ता (कोरगावकर) सी. रामचंद्र (चितळकर) दत्ताराम(वाडकर), सुधीर (फडके) यांसारख्या मराठमोळ्या संगीतकारांनी आपली आडनावे खुबीने लपवीत या क्षेत्रात मुसंडी मारली. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी के. दत्ता यांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शकाचे काम केले होते.
१९५४ साली के.दत्ता यांनी संगीत दिलेल्या ‘रिश्ता’ या चित्रपटातही लता मंगेशकर यांचे साजन से पहली बार, व तलत मेहमूद यांनी गायलेले ‘वोही चांदनी है’ ही गाणी त्या काळी गाजलेली होती. मा.के.दत्ता यांनी अनेक हिन्दी व मराठी चित्रपटाना संगीत दिले. काही चित्रपट, याद, बडी माँ, दामन, नादान, रिश्ता, चंद्रराव मोरे, सुखाचा शोध, गीता, गोरखनाथ, गोरा कुंभार, सूनबाई, महात्मा विदूर, हरिहर भक्ती, रायगडचा बंदी मा.के.दत्ता यांचे २३ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply