के. एल. एम. (रॉयल डच एअर लाईन)(डच: Koninklijke Luchtvaart Maatschappij N.V.) ही नेदरलँड्स देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे.
७ ऑक्टोबर १९१९ साली स्थापन झालेली के.एल.एम. ही सध्या कार्यरत असलेली जगातील सर्वात जुनी विमान कंपनी आहे. के.एल.एम.ची विमाने एकूण ९० हून ठिकाणांवर प्रवासी व मालवाहतूक करतात. अॅम्स्टरडॅम महानगरामधील आम्स्टेलव्हीन ह्या शहरामध्ये के.एल.एम.चे मुख्यालय असून अॅम्स्टरडॅम विमानतळ शिफोल हा तिचा मुख्य विमानतळ आहे.
मे २००४ मध्ये के.एल.एम. व एअर फ्रान्स ह्या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply