पितृपक्ष सुरू झाला आणि वर्षभर अन्नासाठी उकिरड्यावर तसेच घाणिवर फिरणारे कावळे पंधरा दिवसांसाठी आपले पुर्वज झालेत….
पितरांना कावळा शिवला की म्हणे पुर्वजांना मोक्ष मिळतो… पण काय हो या मोक्षाला एक वर्षाचीच Validity असते का? नाही तसे ज्यांच्या मुळे आपण आज आहोत त्या पुर्वजांचे आपण वर्षातून किमान एकदा तरी स्मरण करावे या विचाराचा मी ही आहेच… पण ते या पद्धतीने..? अरे एवढे शुर वीर, बुद्धिमान,सुंदर असे आपले पुर्वज सिंह, वाघ, गाय, मोर, राजहंस, कोकिळ न होता कावळेच का होतील हो.? बरं एक वेळ मान्य करू की झालेही असतील तुमचे आमचे पुर्वज
कावळे पण मग आज पिंडाला शिवण्यासाठीही कावळा दिसत नाही का घटली ही संख्या कोठे गेलेत आपले हे पुर्वज.? देशातील मृत्यूदरा एवढा कावळ्याचा जन्मदर का नाही..?
बंधुनो आपल्या पुर्वजांचे स्मरण नक्कीच करा परंतू त्यांचे कर्तुत्व पाहुन त्यांच्या स्मरणार्थ काही सामाजिक दातृत्व स्विकारा, आपल्या संस्कृतीला सुद्धा जपा परंतू अंधश्रद्धा झुगारून, पुर्वजांच्या निमित्ताने मुक्या प्राण्यावर ही प्रेम करा पण वर्षभर….त्यांची काळजीही घ्या , पक्ष्यांच्या घटत्या संख्येची कारणे लक्षात घेऊन त्याला आळा घाला व पर्यावरणाचे संतुलन राखा. नाहीतर हे कावळे फक्त आपल्याला बाराखडीच्या पुस्तकातच चित्र रुपाने पाहावे लागतील….
आपल्या रुढी परंपरा पाळाच पण त्यातील अंधश्रध्दा लाथाडून. …
ता.क. बदलत्या कालानुरूप भारतीय परंपरा पाळणारा मी एक पुरोगामी आहे….
— प्रतीक मिटकरी
(आम्ही साहित्यिक या फेसबुक ग्रुपवरील निवडक साहित्य येथे प्रकाशित केले जाते)
Leave a Reply