का रमाकृष्ण ना कोणी वदले?…..
राधे कृष्ण राधे कृष्ण, मी ही मनापासून वदले
हरि सोबत तु असतानाही, रमाकृष्ण ना कोणी वदले …..
ना तुझे नाव माझे झाले, ना तुझे मन माझे झाले
रंग मलाही सावळा लागला, तरी रमा कृष्ण ना कोणी वदले ….
तुझी राधेवरची ती माया, का रे एकदाच सारे घडले
मी अर्धांगिनी रुक्मिणी, तुझी वाट पाहुनी थकले …..
तुझी संपूर्ण मी होऊनही, अपूर्ण काहीसे राहीले
संगम मनाने केला मनाशी, तरी मनोरमा नाही बनले ….
स्वर गुणगुणनारी ती, बासरी एकदाच तिच्याशी हसले
जे तुला कधी न कळले, ते सारेच तिने जाणिले ….
हरि बनुनी येउनी जा, एकदा रमेचे होऊनी जा
जाता जाता वृंदावनात, रमाला राधा बनवूनी जा ….
— स्वाती पवार
Leave a Reply