असे कसे गं असे कसे.
कां तुझे गं मज वेड असे
वेळी, अवेळी केव्हांही
नेत्री सामोरी गं तूच असे।।
नित्य प्रभाती त्या नभाळी
तांबूसलेल्या सांजसकाळी
आठविताच सहजी तुजला
खुदकन मनी मीच कां हसे।।
हिरव्या वेली, कोमल कळी
अलवार, जणू तूंच उमलते
पाकळी पाकळी अधर तुझे
मकरंदा गंध तुझा कां असे।।
निर्मल, शामल तुझी गं तनू
माळूनी घेता श्वेत चंद्रचंद्रिका
उजळुनी टाकिते नभांगणाला
सर्वत्र स्पर्श तुझाच कां भासे।।
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ८.
८ – १ – २०२२.
Leave a Reply