“बॅरिस्टर ” केलं विक्रम गोखलेने! त्यानंतर सचिन खेडेकरने प्रयत्न केला. पण विक्रम तो विक्रमच!
लागूंच्या नंतर खूपजणांनी ” नटसम्राट “चे शिवधनुष्य शब्दशः उचललं , पण नांव कोरलं गेलं ते फक्त श्रीराम लागू!
बाबूजींच्या नंतर “गीत रामायण ” सादर झालं , पण आजही सुधीर फडके हेच नाव ओठी येतं.
“शंकराभरणम ” च्या सोमायाजुलू ची प्रतिकृती “सूर संगम “च्या गिरीश कर्नाडला झेपली नाही. तो डावाच राहिला.
भक्तीच्या उंचीची “फुलराणी “परत दिसली नाही.
“इजाजत “करावा गुलज़ारने आणि “प्यासा ” गुरुदत्तने!
अजूनही वाटतं – ” घेई छंद ” फक्त वसंतरावांनीच गावं ! ” ऐ मेरे वतन के लोगो ” लतानेच म्हणावं ! ” जाने कहा ” ला मुकेशच हवा.
काळाची कोरीव लेखणी यांना फितूर असते. तेथे एकाच नांवाला स्थान असते – म्हणूनच “डॉन ” म्हणजे फक्त अमिताभ. तेथे दुसरा शोभत नाही. येथे “प्रति सचिन” संभवत नाही.
हे असं उत्तुंग नव्या पिढ्यांना खुणावत असतं, ते जीवापाड प्रयत्नही करतात पण ———
या दिगंत मंडळींनी आपल्या आकाशावर, त्यांच्या त्यांच्या कर्तृत्वाचा ओंकार कोरून ठेवलाय. हे लेखन अक्षर असतं आणि पुन्हापुन्हा काळावर उमटत नाही. आणि आपण ते पुसून टाकू शकत नाही.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply