नमस्कार मंडळी कसे आहात ? आज मी गंभीर पण प्रेमाच्या विषयावर माझे मत घेऊन आलोय. तो विषय म्हणजे काळजी. काळजी या शब्द मध्ये खूप काही दडलेला आहे. चला तर मग या विषयावर आपण काही विचार जाणून घेऊया.
माणूस असो , प्राणी असो किवा निर्जीव वस्तू प्रत्येकाची काळजी माणसाला घ्यावीच लागते. ज्याचा मनात प्रेम असेल ज्याचा मनात करुणा असेल तिथे काळजी आपोआपच घेतली जाते. काळजी घेणे हे कधीही चांगलेच. तसे पाहता काळजी चे अनेक प्रकार आहेत जसे पालकांना स्वतःच्या मुलांबाबतची काळजी , नेत्यांना त्यांचा समाजाबद्दलची काळजी , साहेबांना त्यांचा कर्मचाऱ्यांबाबतची काळजी , डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांची काळजी , दुकानदाराला त्याच्या ग्राहकांची काळजी , पशू प्रेमींना सगळ्या प्राण्यांची काळजी, मुलांना आई वडिलांची काळजी तसेच सर्वात महत्वाचे नवरा बायको ला एक मेकांची काळजी असे अनेक काळजी चे प्रकार आहेत.
इतकेच न्हवे तर माणसाला निर्जीव वस्तू ची सुद्धा काळजी घ्यावी लागते जसे एखाद्या व्यक्ती ने नवीन वस्तू विकत घेतली तर ती दिर्घ काळ व्यवस्थित राहावी या साठी तो रोज तिला पुसतो, स्वच्छ ठेवतो आणि काही बिघाड झाली असेल तर ती लवकरच दुरुस्त करून आपण त्या वस्तू ला ठीक करतो.
तसे पाहायला गेले तर माणसांना जीवन एकदाच मिळते. लोकांनी आपल्या परिवारातील सदस्यांची एक मेकांनी काळजी घ्यायलाच हवी. मित्रहो रस्त्या वर एखादे कुत्र्याचे पिल्लू ला जर दुखापत होत असेल तर त्याची आई विचारी काळजीपोटी इकडे तिकडे मदतीसाठी फिरत असते. आपण तर माणस आहोत.
दुर्दैवाने बऱ्याच ठिकाणी आपल्या समाजात असे बघायला मिळते की आपले लोक काळजी करणे विसरत चालले आहेत. आपल्या आई बाबांची काळजी करणे मुलं विसरत चालले आहेत. रस्त्यावर जर दोन गाड्यांमध्ये ठोस लागली तर एक मेकांना मरायला जातात पण कोणी हे नाही म्हणत की का रे बाबा लागला आहे का काही तुम्हाला ? दवाखान्यात जायच का ? त्याचा जर हात तुटला असेल तर रागापाई त्याचा पाय पण तोडून टाकतात.
काही ठिकाणी असे बघायला मिळते की काही लोक काळजी करण्याचे स्वतः ढोंग करतात, स्वतः इतरांची काळजी घेत नाहीत आणि जे खऱ्या अर्थाने काळजी घेतात त्यांना पण एक मेकांची काळजी घेऊ देत नाही . चार चौघांन मध्ये काळजी च्या नावाखाली खिल्ली उडवली जाते.
नवरा बायको वरून सांगायचे झाले तर नवरा बायकोचे नाते हे प्रेम आणि काळजी या दोन गोष्टींनी अजून घट्ट होते.
ज्यांना आई वडील नाहीत , ज्यांना बाहेरून कोणाचाच आधार नाही अशांनी बिनधास्त पणे जगासमोर एक मेकांची काळजी घेणे आवश्यक आहे कारण दुसरा कोणी संकटाच्या वेळेस आपली काळजी घ्यायला येत नसतो ही सध्याची परिस्थिती आहे. लोक काळजी वरून सल्ले देतील ., मजा घेतील , मदतीच आश्वासन पण देतील पण वेळेवर कारण सांगून एकट पण पाडतील.
शेवटी इतकंच सांगायचे आहे की प्रत्येकाने एकमेकांची काळजी करा , प्रेम करा. निदान जर काळजी करू नसेल शकत तर त्या वर इतरांची मजा उडवून समोरच्याची मानसिकता खराब करू नका. अशाने निष्पन्न काहीच निघत नाही.
मित्रहो, आता तुम्हीच मला सांगा काळजी करणे योग्य की अयोग्य ? का नाही करावी काळजी ? आपले देव दैवत आपल्याला प्रेम करा , काळजी घ्या आदर करा हेच शिकवतात. म्हणूनच म्हणतो मित्रहो काळजी केल्याने एकमेकांबद्दल चे प्रेम आजून घट्ट होते. हे लक्षात ठेवा.
निनाद चंद्रकांत देशपांडे
अमरावती
९९२२६१३००१
Leave a Reply