“कालरात्री” मा दुर्गेचे सातवे स्वरुप ! “एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यर्त्कशरिरिणी । वामपादोल्लसल्लोहलता कण्टक भूषणा वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङकरी ।। ” अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासुन सुरु होणार्या नवरात्रात मा दुर्गेच्या नऊ रुपांची उपासना केली जाते, त्या नवशक्तींच्या रुपांपैकी सातवे स्वरुप म्हणजे कालरात्री होय. सर्वसंहारक, प्रलयंकारी, रौद्र रुप धारण केलेली देवी म्हणजे कालरात्री होय. “रौद्री तपोरता देवी तामसी शक्तिरुत्तमा, संहारकारिणी नाम्ना कालरात्रिं च तां विंदुः।” रौद्र रुप धारण केलेली, तपश्चर्येत रममान संहारक अशी ती तामसी शक्ती, तीला कालरात्री म्हणतात. काळ हा सर्वसंहारक आहे, परंतु प्रलयात काळाचाही नाश होतो. अशी नाशाची भिती काळालाही निर्माण करते म्हणुन कालरात्रि होय. ही देवी चतुर्भुज असुन, उजव्या हातांची वरमुद्रा व अभयमुद्रा आहेत. डाव्या हातात तलवार व लोखंडाचा काटा आहे. देवीचे वाहन गर्दभ (गाढव)असुन, दिसावयास भितीदायक असलेली देवी, सदासर्वकाळ शुभ फळ देणारी आहे. देवीला शुभंकारी या नावानेही ओळखले जाते. साधकांनी सहस्त्रारचक्रात लक्ष केंद्रीत करुन उपासना करावी. देवीच्या पुजेने सिद्धीची सर्व द्वारे उघडली जातात. यम नियमांचे पालन करीत आराधना करणार्या साधकांचे सर्व दुःख, ग्रहबाधा, भय व शत्रुंचा नाश होतो. कालरात्रि स्तोत्रपाठ हीं कालरात्रि श्री कराली च क्लीं कल्याणी कलावती। कालमाता कलिदर्पध्नी कमदीश कुपान्विता॥ कामबीजजपान्दा कमबीजस्वरूपिणी। कुमतिघ्नी कुलीनर्तिनाशिनी कुल कामिनी॥ क्लीं हीं श्रीं मन्त्र्वर्णेन कालकण्टकघातिनी। कृपामयी कृपाधारा कृपापारा कपागमा॥
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply