नाही कशी म्हणू,
पगार जास्त देते थांब,
परी माझे काम सोडून
जाऊ नको लांब.. !
नाही कशी म्हणू तुला,
तुझा काढते वीमा, फंड
पण विरोधात नको माझ्या
पुकारुस बंड.. !
नाही कशी म्हणू तुला,
T.V. पहा दूपारी,
परी आधी माझे काम आणि,
मग जा शेजारी.. !
नाही कशी म्हणू तुला,
वर्षाकाठी साडी,
परी सोसायटीमधल्या मला,
सांग भानगडी.. !
नाही कशी म्हणू तुला,
महिन्याला दोन घे ‘सुट्ट्या’
पण अचानक दांडी मारुन
पाडू नकोस पिट्ट्या
माझा पाडू नकोस पिट्ट्या.. !
— सौ. अलका वढावकर
Leave a Reply