नवीन लेखन...

काय भरोनी ठेविले (सुमंत उवाच – ४०)

काय भरोनी ठेविले
काय उलगडुनी देखिले
काय मना सांगितले
कोण जाणतो

मना स्पर्श करुनि गेले
इतर कोणाचे दुःख
मग सुख कोणाचे सांगा
का खुपते

अर्थ-

जे दिसत नाही, जाणवत नाही, दाखवता येत नाही त्या मनाला सावरणे, आवर घालणे, भक्कम बनवणे किती कठीण आहे. हा विचार ते करायला गेल्या शिवाय समजत नाही. किती वर्दळ आहे मनात माझ्या, असं प्रत्येकालाच वाटते. नक्की काय आहे मनात याच्या हे सांगणे कोरोना कधी संपेल या उत्तरापेक्षा कठीण आहे, नाही का?

कोण आपलं मन किती मोकळं करतो, कोण किती लपवतो, कोण किती दाखवतो यावर आयुष्याचा सगळा खेळ सुरू असतो.

मला पावसात भिजायला आवडतं, कारण माझें अश्रू दिसत नाहीत कोणाला हे जगप्रसिद्ध वाक्य ज्याने म्हटले तो आयुष्यभर सर्वांना हसवून गेला.

तोच व्यक्ती जगाला आवडतो, जगाला आपलंसं करू शकतो जो जगाच्या दुःखाला आपलंसं करून त्यावर फुंकर घालतो पण या स्थितीत मनाला आणणे फार कठीण, कारण इतरांचे दुःख पचते. पण इतरांचे सुख पचते का? ते जेव्हा पचायला लागेल, ते जेव्हा आपण मनापासून accept करायला लागू तेव्हा मन शांत होईल. इथे परत मनाचा खंबीर आणि समज या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

स्वतःच दुःख लपवून जो इतरांच्या सुखासाठी झटतो तो खरा मनुष्यधर्म. पण जो आपलं सुखं कवटाळतो पण दुसऱ्याच्या सुखाला नावं ठेवतो तो मनुष्यप्राणी असूनही त्यात माणसाचा अंश काही सापडत नाही.””

— सुमंत परचुरे.

सुमंत जयंत परचुरे.
About सुमंत जयंत परचुरे. 146 Articles
व्यवसाय- ऋतू फूड्स - विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट्स उत्पादन. शिक्षण- हॉटेल मॅनेजमेंट. छंद- गेली 27 वर्षे सहयाद्री मधे भटकंती, 200 हुन किल्ले भटकंती पूर्ण. काव्य लेखन, कथा लेखन, प्रवास वर्णनं लेखन करणे. " Bharpet " नावाने youtube चॅनल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..