आपण लहान असताना आपली आई किंवा आज्जी दर रविवारी आपल्याला सकाळी उठवून जे बाळकडू पाजत ते हेच किराईते.कृमींपासून संरक्षण व पोटला बरे म्हणून आज हि बऱ्याच घरांमधून सर्वांनाच हा कडू काढा रविवारी पाजण्याची प्रथा आहे.
ह्याचे ०.५-१.५ मीटर उंचीचे वर्षायू क्षुप असते.काण्ड खाली गोल व वर चतुष्कोणी असते.पाने अभिमुख ५-७ सेंमी लांब व १-२ सेंमी रूंद असतात.पाने भालाकार असतात.पुष्पमंजिरी अनेक उपशाखा युक्त व त्याला हिरवट पिवळी फुले येतात.फळ अंडाकार व ५ सेंमी व्यासाचे असते व बीज स्निग्ध व बहूकोणी असते.
ह्याचे उपयुक्तांग पंचांग अाहे.ह्याची चव कडू असून,हे थंड गुणाचे असते व हल्के व रूक्ष असते.हे वातकर असून शरीरातील कफ व पित्त कमी करते.
चला आता आपण काडेचिराईताचे उपयोग जाणून घेऊ:
१)काडेचिराईताचा काढा जखम धुवायला वापरतात.
२)ह्याचा काढा कृमिंमध्ये उपयुक्त आहे.
३)तापामध्ये देखील काडेचिराईत उपयुक्त आहे.
४)त्वचा रोगांमध्ये स्त्राव व खाज कमी करण्यासाठी काडोचिराईत उपयुक्त आहे.
५)अम्लपित्तामध्ये काडेचिराईत व माक्याचा काढा मध घालून देतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply