कहाणी तारुण्याची
तुझ्या माझ्या प्रितीची
अलगद मिठीची
ओढ सहवासाची।।१।।
स्वप्ने सुखी संसाराची
तुझ्या नी माझ्या प्रेमाची
धुंदी असे जवानीची
चिंता नाही भविष्याची।।२।।
चल दुर जाऊ एकांतात
हितगुज साधू आपसात
हातात गुंफूनी आपले हात
चल जाऊ घरी झाली सांजवात।।३।।
हा गजरा मलाच राहू दे
तनस्पर्श तुझा दरवळू दे
सुवासातला मादछक सहवास दे
नित्य जवळी असा वास असू दे।।४।।
स्मरले दिवस तारुण्यातले
तुझ्या नी माझ्या प्रीतीतले
क्षण वेचतो सदैव त्यातले
हे नाते अभंग प्रीतितले
सौ.माणिक(रुबी)
Leave a Reply