काही गोष्टी कधी
लक्षात येत नाहीत..
तिला काय हवे ते
ती कधी सांगत नाही..
फक्त सूचना देते…
आणि आपण मात्र
वेध घेत असतो
भोळसटपणे….
प्रेमात हे असेच असते
पटकन ओळखता आले पाहिजे
प्रेमाला खरे तर शब्दांचा भार
सोसवत नाही त्याला त्याची
सवय नसतेआणि जिथे सवय
असते तेथे प्रेम नसते
असतो
तो फक्त
व्यवहार….
दोन देहाचा
दोन भोगांचा…
— सतीश चाफेकर.
Leave a Reply