काही शब्दांचे ओरखडे हृदयी उमटतात
कळत नाही निःशब्द घाव कधी बसतात
कुणी येत अवचित वसंत पालवी लेऊन
आयुष्यात स्थिरावत अलगद सावली बनून
मन भरुन झालं की भावनांचा खेळ होतो
कोण मग हलकेच अंतरी रडवून जातो
इथे तिथे शब्दांचे फटकारे सारे बसतात
स्त्रीला संयमाचे धडे सहज मिळतात
कुणी आयुष्य अलगद व्यापून जातं
आईचं बोलणं शब्दांत शहाण करुन जातं
शब्दांचे बाण जिव्हारी फटकन लागतात
चुकलेल्या वाख्येत मनाला घाव बसतात
शब्दांचा खेळ सारा रोज बोथट करतो
रोज नव्याने घाव आल्हाद होत जातो
अश्रूनाही फारशी किंमत उरत नसते
माणस माणसांना वापरुन धार बोथट होते
टाईमपास हा कधी कधी शिकवून जातो
कळ्यांचा भाव फुलांना न कळतो
सहज कुणी आयुष्यात येऊन जातं
विखुरलेले रंग विस्कटून आल्हाद जातं
विश्वासात अविश्वास सहज खपून जातो
माणूस माणसाला बोलून तोडून टाकतो
निःशब्द मन अलवार हरवून जातं
त्यालाही माहीत नसतं खेळ मनाचा उरतं
अशी कशी बोच एकाकी मग रुतते
कोण दुःखी होतो तर कोणाचे मन हर्षते
भावविश्वात प्रेम कुणावर करु नये
गुंतल मन अलवार तर मोहात रुतु नये
शब्दांचे घाव कुणी मनावर सहज करतात
असे कसे अश्रू अंतःकरण रडवून जातात
आईच्या वात्सल्यात ऊब मायेची असते
कोण हलकेच रडवून आयुष्य मिटून जाते
संथ पाण्यात सायंकाळ केशरी भिजते
जीव लावला अंतरी तर सल कातरी बोचते
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply