नवीन लेखन...

काजोल

सध्याच्या् काळात आघाडीच्या आणि नामांकित अभिनेत्रींमध्ये समावेश होत असलेल्या काजोलचे कुटुंब चित्रपट उदयोगात अनेक वर्षांपासून आहे. तिचा जन्म ५ ऑगस्ट १९७४ रोजी मुंबईत झाला. आई तनूजा मराठी कुटुंबातली, वडील चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी बंगाली. मावशी नुतन सर्वाधिक पाच वेळा फिल्म फेअर पुरस्कातर पटकावलेली नामांकित अभिनेत्री.

पणजी रतन बाई आणि आजी शोभना समर्थ यांच्या वारशाखाली तयार झालेली काजोल. इतकेच नव्हेी तर काका जॉय मुखर्जी आणि देव मुखर्जी हे देखिल त्यांच्या काळातील गाजलेले कलावंत. शाळेत शिकत असतांना तिला पहिला ब्रेक मिळाला. काजोलचा पहिला चित्रपट ‘बेखुदी’ हा होता. काजोलने ‘बेखुदी’ या चित्रपटाच्या माध्यामातून जेव्हा बॉलीवूडमध्ये प्रवेश केला तेव्हा तिच्या पदरी पडली साफ निराशा. काजोल दिसायला सर्वसामान्य् तरुणींसारखीच सामान्य. पण ‘बाजीगर’मध्ये नवख्या शाहरुख सोबत आपल्याय अभिनयाची चुणूक दाखवत तिने बॉलीवूडमधले आपले स्थान पक्के केलेच. या जोडीने नंतर मग अनेक हीट चित्रपट दिले.

शाहरुखच्या यशामागे काजोल सोबत जमलेली केमिस्ट्री हा देखिल महत्वांचा विषय म्हणला पाहिजे. मात्र त्यानंतरच्या अनेक चित्रपटात तिने अनेक उल्लेखनीय भुमिका केल्या . त्याशत हळुवार प्रेमाची अनुभूती देणारी दिलेवाले… मधली सिमरन असो किंवा ‘गुप्त’ मधली आक्रमक खलनायिका अनेक चित्रपटात तिने अभिनयाची जादुगरी दाखविली. त्यानंतर तिने शाहरूख सोबत करण- अर्जुन,दिलवाले दुल्ह.निया ले जायेंगे, कुछ कुद होता है आणि कभी खुशी कभी गम यारखे अनेक हीट चित्रपट केले. त्या‍तील ‘दिलवाले…’मध्ये आजही जोरदार गर्दी खेचण्याची क्षमता आहे. .या चित्रपटानेच तिला पहिल्यांदा उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कारही मिळवून दिला.

काजोल आणि अजय देवगन यांनी १९९९ मध्ये लग्न केले. दोघांची भेट ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हळू हळू दोघांची दोस्ती आणि प्रेम जुळले. त्यांचे लग्न पारंपरिक मराठी पद्धतीने झाले होते. बॉलीवूडमध्ये लग्न झालेल्या हिरोईनचे करीअर नंतर पूर्णतः संपल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र लग्नानंतरही काजोलने पती अजय सोबतही यशस्वी चित्रपट केले. त्यात कभी खुशी कभी गम या हीट चित्रपटाचाही समावेश आहे. काजोलच्या नावावर आतापर्यंत उत्कृष्ट अभिनेत्रीचे सर्वात जास्त फिल्मफेअर अवॉर्ड्स आहेत. या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट् अभिनेत्रीचे अनेक पुरस्कार मिळाले. तर तिसरा फिल्म फेअर पुरस्कार ही पटकाविला.

आमीर खान सोबत तिने ‘फना’ हा तर पती अजय सोबत ‘यु मी और हम’ हा हीट चित्रपट दिला. तर शाहरुखच्या ‘ओम शाती ओम’मध्ये आपल्या नृत्या चे जलवे दाखविले. तिने पतीसोबत चित्रपट निर्मिती व्यवसायातही पाउल टाकले आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..