
मळकट- कळकट लाकडाच्या एखाद्या तुटलेल्या भागासारखी दिसणारी ती कलिंगडाची फोड एक कलाकृती आहे, हे आम्हाला कस कळणार, हा पवित्रा तिथल्या कर्मचा-यांनी घेतला. त्या कलाकाराला काय बोलाव समजेना.
रात्री नऊनंतर काळाघोडा परिसरातील वर्दळ एकदम कमी होते. फारसा उजेडही नसतोच. अशाच एका काळोखी रात्री काळाघोडा परिसरातील जहांगीर कलादानाच्या समोर एका कलाकाराला जबरदस्त हादरा बसला.
जहांगीर कलादालन हे मुंबईतील कलाप्रेमींच आवडत ठिकाण. परदेशतील कलाप्रेमी मुंबईत आल्यावर जहांगीर कलादालनाला भेट दिल्याश्विाय राहत नाहीत. प्रस्थापित तसच उभारीचे उमेदवारी करणारे कलाकार जहांगीरला प्रार्थनास्थळाच्या जवळ मानतात. कारण इथेच त्यांच्या कलेचे चीज होते. नाव होत. नवीन काही करण्याची उमेद मिळते. तसेच इथल्या जीवघेण्या स्पर्घेत स्वप्नभंगही कमी होत नाहीत. जहांगीरच्या पायऱ्या चढून एकदम आत जाण्यापूर्वी त्यावर बसून चार क्षण घालवून मगच कलादालनात पाऊल टाकायच धाडस होत.
त्याच कलादालनापुढून जाताना अहमदाबादच्या कलाकाराला धक्का बसला. जहांगीर कालादालनात त्याच्या कलाकृतीच प्रदर्शन भरणार होत. त्यासाठी त्याने आपल्या कलाकृती कलादालनाच्या सुरक्षागृहात ठेवल्या होत्या. कलादानाकडे बघत बघत पुढे जाताना त्याच्या पायाला काहीतरी लागल म्हणून तो अडखळला आणि कशाला पाय लागला म्हणून बघतो तर त्या अंधाऱ्या रात्री त्याच्या डोळयांपुढे काजवे चमकले.
त्याची आवडती कलिंगडाची फोड रस्त्यावर धूळ खात पडली होती. मन लावून केलेली ती फोड शिल्पकलेचा त्याच्या मतानुसार सर्वोत्कृष्ट नमुना होता आणि कलादालनाचे कर्मचारी कचरा साफ करण्यात मग्न झालेले होते.
कलिंगडाची फोड हातात घेऊन त्याने कलादालनातल्या कचेरीत धाव घेतली. पण त्याच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कुणीच नव्हत. उलट आपल्या वस्तू नीट न ठेवल्याबद्दल त्या कलाकारालाच चार शब्द सुनावण्यात आले. नवखा होता. त्याने ऐकून घेतले.
मळकट- कळकट लाकडाच्या एखाद्या तुटलेल्या भागासारखी दिसणारी ती कलिंगडाची फोड एक कलाकृती आहे, हे आम्हाला कस कळणार, हा पवित्रा तिथल्या कर्मचा-यांनी घेतला. त्या कलाकाराला काय बोलाव समजेना.
पण जहांगीर कलादालनात नवख्या उमेदवारी करणाऱ्या कलाकाराना चांगली वागणूक मिळत नाही. अशी कलाकाराची तक्रार आहे, तर तिथल्या कर्मचाऱ्याना प्रश्न पडतो हया मंडळीना कस आवराव. नवकला समजणार कशी? एका पावसाळी प्रदर्शनाची कथा कलाकाकरांच्या वर्तुळात प्रसिध्द आहे. एका कलाकाराने आपल चित्र प्रदर्शनात दिल. प्रदर्शन सुरु झाल्यावर ते बघायला तो आला. तेच चित्र उलट टांगलेल होत. त्याच्या विरुध्द आवाज उठवण्याचा त्याचा विचार होता. पण बाजूला लावलेला प्रशस्तिपत्रकाचा बिल्ला बघून तो गप्प बसला म्हणजे. अतिसामान्य चित्र उलट लावल्यामुळे घोटाळा झाला होता. कला कशाला म्हणावी आणि कशाला म्हणू नये हा सहज प्रश्न आहे. तो कलाक्षेत्रातील समीक्षकांसकट नावाजलेल्या कालाकारांना सोडवता आलेला नाही.
पण कलाप्रदर्शनात मांडण्यासाठी दिलेल्या वस्तू व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी कलादालनाच्या कर्मचा-यांची नाही काय, हा प्रश्न कलाकार विचारत आहे. मग धान्याच्या गोदामातील कर्मचारी आणि जहांगीर कलादालनातील कर्मचारी यांच्या काही फरक आहे की नाही. प्रदर्शात ठेवायला दिलेली वस्तू अडगळीची गोष्ट म्हणून कचऱ्यात फेकून देणाऱ्या कर्मचाऱ्याना काय म्हणाव? दोष त्या कर्मचाऱ्याचा नसून कलादालनाच्या व्यवस्थापनाचा आहे.
बाहेरगावचे अनेक कलाकार आपल्या कलाकृती जहांगीरमध्ये लावण्यासाठी येतात. पण त्या ठेवायला जागा नसते. एक प्रदर्शन झाल की दुसर लावण्याची घाई असते. त्यामुळे अनेक घोटाळे होता. बराच खर्च करुन लांबून कलाकार आपल्या कलाकृतींसकट दाखल होता. पण आठ दिवसांच्यावर त्यांना कलाकृती ठेवता येत नाहीत. इतक्या कमी कालावधीत त्या खपत नाहीत आणि मग त्या परत घरी घेऊन जाण किंवा अगदी कमी किमतीत त्या विकून टाकण हा एकच पर्याय त्यांच्यासमोर राहतो.
पण ही झाली प्रदर्शन लावायला परवागनी मिळाल्यानंतरची उठाठेव. वर्ष- दोन वर्षांसाठी कलादालनाचे दोन्ही हॉल भरलेले असतात. त्यानंतर तारीख मिळते तीसुध्दा कधीही रद्द केली जाईल या अटीवर. त्यामुळे शेवट पर्यंत टांगती तलवारच राहते. पण काही कलाकाराना मात्र त्यांना पाहिजे त्यावेळी कलादालन उपलब्ध होत. प्रस्थापित कलाकार आणि नवोदित कलाकार असे दोन भाग करुन कलाकाराना प्रोत्साहन मिळण्यसाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यातूनच आर्टिस्ट सेटरची निर्मिती झाली. जहांगीरबरोबरच इतरही बऱ्याच कलादालनांची निर्मित झाली आहे. काही व्यवसायिक कलादालनही आहेत पण तिथे नवीन कलाकाराना प्रवेश मिळणे मुश्कील. त्यात पंचतारांकित हॉटेलातील आर्ट गॅलरीज आहेत. तिथेही चांगल्या कलादालनाचा शिक्का लागत नाही. तोपर्यात त्याला कलाकार म्हणून कोणी ओळखत नाही. त्यामुळे कलादालनाच व्यवस्थापन कलाकाराना बेकिकिरीने वागवू शकत आणि वाटेल तस पळू शकत. जहांगीर कलादानातही लाल फितीच राज्य आहे. फक्त तिचा रंग गुलबक्षी आहे, त्यात कलाकाराला गुदमरायला होत.
-प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक २९ सप्टेंबर १९९४
Leave a Reply