मनाेहर पर्रिकर, सुषमा स्वराज आणि आता अरूण जेटली… एक एक करून तीन माेहरे काळाने आपल्यापासून हिरावून नेले. कसलाही काैटुंबिक राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्त्वावर उच्चस्थानी पाेहाेचलेल्या या तिघांनी आपल्या कार्यातून व्यक्त्वित्त्वाची अमीट छाप जगावर साेडली.
पण मला एका याेगाचे आश्चर्य वाटतेय. पर्रिकरांनी स्वेच्छेने दिल्ली साेडून पणजी जवळ केली. ते तेथेच रमले. आकस्मिकपणे कालवश झाले. सुषमाजींनी या वेळी निवडणून लढविण्यास नकार दिला आणि सत्ता आल्यानंतर माेदींच्या आग्रहानंतरही मंत्रिपद नाकारले. अरुणजींनी अगदी स्वच्छपणे पत्र लिहून मंत्रिमंडळासाठी आपला विचार करू नये असे सुचविले हाेते. मरेपर्यंत खुर्ची उबविण्याच्या इथल्या इतिहासात असे वेगळेपणाचे निर्णय क्वचितच दिसले.
नियती अनेक गाेष्टी घडवून आणते. तिघेही केंद्रात असते तर त्यांच्या निधनाचे हे धक्के सरकारसाठी सुरळीत कामकाजाच्या दृष्टीने समस्या हाेऊ शकले असते. पर्याय शाेधताना आणि गाडे रुळावर आणताना त्रास झाला असता. कुठल्या अंतस्थ शक्तीने त्यांना राेखले, हे परमेश्वर जाणाे. पण आपल्यामुळे देशाचे नुकसान हाेता कामा नये, याचा आदर्शपाठ या तिघांनीही घालून दिला. ताे नव्या पिढ्यांसाठी अनुकरणीय ठरेल.
विनम्र श्रद्धांजली
— लेखक.. व्हॉटसऍपवरील अनामिक
Leave a Reply