काळजातला झंझावात, उफाळत बाहेर येत,
किती एक वर्षानंतर,
जीव जिवास भेटत,
स्मृतींची मनात ओळ,
केवढेतरी अधोरेखित,
दोन टिंबे एका रेषेत,
रेखली करत अंत,–!!!
आसूंसे भेटण्या जीव,
गाली हसे नशीब,
लागले करण्या हिशोब,
उभे राहून करत कींव,–!!!
मनातल्या मनात वादळ,
दडपावे भावकल्लोळ,
सामोरी येता मूर्त,
थांबला वाटतो काळ,–!!!!
दिवस आणखी तास,
पडले केवढे अंतर,
भोवती खूप वर्दळ,
तरीही एकांत -भास,–!!!!
स्पर्श कराया तुज,
धाडस लागे आज,
खेळ खेळे प्राक्तन,
खडे लेऊन सुख – साज,–!!!
गालावर हास्य उमटत,
परकेपण त्या खळीत,
संपत सारे अद्वैत,
आत्मे काहूर माजवत,–!!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply