“आवाज, अभिनय, लेखन असा एकत्रित योग जेव्हा एखाद्या व्यक्तीत जुळून येतो तेव्हा तो एक उत्तम कलाकार म्हणून चपखल असतो असं म्हणतात. तर असे त्रिवेणी योग जुळलेला हौशी आणि सदैव तरुण असणारा कलाकार म्हणजे नितीन माधव.
माणसातले अंगभूत गुण आणि इच्छा फारकाळ त्याचा ध्येयापर्यंत वंचित ठेवू शकत नाही. हेच घडलं अभिनेता नितीन माधव सोबत दहावीत उत्तम गुण मिळल्यानं नागपूरातल्या ”दत्ता मेघे पॉलिटेकनिक महाविद्यालयात” इलेक्ट्रॉनिक्स साठी प्रवेश मिळाला. मुळात कलेसाठी प्रेम असल्या कारणाने हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासून कामं करण्यास सुरुवात केली, त्यावेळेस अनेक पातळीवर त्याच्या अभिनयाचं आणि आवाजाचं कौतुक ही करण्यात आलां होतं, पण शिक्षण पूर्ण झाल्यावर एका खासगी कंपनीमध्ये नोकरी मिळाली अन् रंगभूमीवरील नायकांसाठी असलेला त्याचा वावर थोडा कमी झाला,पण म्हणतात ना कलाकारी मन माणसाला सृजनशील अदेसाठी प्रवृत्त करतेच! आणि नेमकं हेच नितीन च्या बाबतीत, आपलं कलाकार म्हणून असलेलं ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला, व कलेच्या प्रांतात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्यांनी गाठली “मायानगरी” मुंबई.
पण मुंबईत रहाणं, इथल्या वातावरणाशी जुळून घेणं, तसंच मुलभूत प्रश्न यासाठीचा संघर्ष असे अनेक प्रश्न समोर असतानाही त्यांनी हे आवाहन लिलया पेललं; आकाशवाणी मुंबई केंद्रात कार्यक्रम सहाय्यक आणि नैमितीक उद्धघोषक या पदासाठी त्याचा सुमधुर आवाजामुळे निवड झाली, तिथे त्याचा अभिनय गुणांना अनेक पैलू पडत गेले; आणि पुढे मुंबईतल्या “आविष्कार” या हौशी रंगभूमी म्हणून ओळखल्या जाणार्या नाट्य संस्थेशी त्याचा संपर्क आला, आणि त्यांनतर त्यांनी मागे वळून पाहिलच नाही, अविष्कार मध्ये त्याची भेट ज्येष्ठ नाटककार सत्यदेव दुबे, चेतन दातार यांच्याशी झाली व त्यांच्या सोबत अनेक प्रायोगिक नाटकांतून कामं केली, यामध्ये “जंगल भूतम्” अशा नाटकांचा समावेश होतो; या रंगभूमीचा उपयोग त्याला सिनेमा, दूरचित्रवाणी मालिका, डबिंग आणि निवेदन यासाठी झाला, कारण नाटक सुरु असतानाच आपल्या भारदस्त व अनोख्या आवाजामुळे त्याची निवड चित्रपटासाठी डबिंग आर्टिस्ट म्हणून ही झाली. उलाढाल, वासुदेव बळवंत फडके, फॉरेनची पाटलीण, क्षण अशा लोकप्रिय आणि गाजलेल्या चित्रपटात त्यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे त्यासोबतच “अॅनिमेटेड फिल्मस्” “टिव्ही शो” यासाठी सुद्धा त्याचा आवाज वापरण्यात आला आहे.
अभिनय हे नितीन चं पहिलं प्रेम असल्याने, नाटकांसोबतच “दाह”, “कामा पुरता विमा”, अशा चित्रपटात तर इटिव्ही मराठी वर “आकाश झेप”, “माय लेक”, लक्ष्य, आणि पंचनामा या स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये इन्स्पेक्टर च्या भूमिका अगदी नेमकेपणाने साकारल्या आहेत, “हुंकार” या नाटकात एका आदिवासीची व्यक्तीरेखा साकारत खूप लोकप्रियता मिळवली त्याव्यतिरिक्त एक डॉक्युमेंट्री फिल्म आणि जाहिरातींसाठी मॉडेलिंग सुद्धा त्यांनी केलं आहे. तर “बा, बहु और बेबी” त ही नितीन नं हिंदी पडद्यावर दमदार पदार्पण केलं आहे.
सध्याचे तुझे आगामी प्रोजेक्ट्स काय? असं विचारल्यावर नितीन उत्तरतो “विठा” या बहुचर्चित चित्रपटातून अभिनेता उपेंद्र लिमये सोबत सहकलाकार म्हणून काम केलं आहे, आणि हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, पण याशिवाय सध्या कॉपी रायटींग सुरु आहे; तर १०७.१ एफ.एम. रॅम्बो वर आर.जे. म्हणून हीकाम करतोय. या वाहिनीवर “हरितनाद” हा प्रश्नमंजुषेचा, पर्यटनाच्या कार्यक्रमावर मी श्रोत्यांच मनोरंजन करतो, त्याचा या कार्यक्रमाचं आणखीन एक वैशिष्ट्य की, “लाईव्ह” कार्यक्रमांत विविध आवाजांचे इफेक्ट्स वाजवून श्रोत्यांना ही आवडेल असं काहीतरी नवीन व “आगळं वेगळं” ऐकवण्याचा प्रयत्न असतो, ज्यामुळे त्यांच्याशी थेट कनेक्ट ही होता येतं;
कलेतलं विविध मार्ग चोखाळताना, त्यामध्ये वावरल्यावर एक अभिनेता, एक कलाकार कसा समृद्ध होऊन विविध माध्यमात भरारी घेऊ शकतो हे “नितीन माधव” यांच्याकडे पाहिल्यावर कळतं; आपल्या मधुखाणीतून आणि सहज अभिनयातून नितीन माधव कायमच रसिकांना आनंद देत राहील अशी आशा या उमलत्या कलाकाराकडून बाळगायला काहीच हरकत नाही.
Leave a Reply