एका अत्याचार झालेल्या स्री ने सांगितलेले दुःख काव्यात मांडण्याचा केलेला छोटा प्रयत्न
” कळलेच नाही! ” ?
मेरू पर्वत परी दुःखाचा,?
खंत सरता सरली नाही,?
वाहे नदी आश्रुंची नयानांवाटे ,?
कधी आटली,कळलेच नाही !१?
दिशा हरवल्या , वाट बदलली,?
भान जगाचे हरपून गेले,?
होते क्षनिक सुख मुठीत माझ्या,?
हुंदक्याने तेही गिळले, कळलेच नाही!२?
दोष देता कलंकी नशिबाला,?
किचकट प्रश्नांचा कल्लोळ माजला,?
विचार मनाचा, पण निर्णय बुद्धीचा ,?
शांत हृदय होरपळले , कळलेच नाही!३?
व्हायचे ते होऊनही गेले,?
घडायचे ते झटकन घडून गेले,?
काळ वेळ प्रसंग तो घटकेचा,?
नशीबचक्र पालटले , कळेलच नाही!४?
…. कु. श्र्वेता काशिनाथ संकपाळ.
Leave a Reply