|| हरि ॐ ||
भारतात अनेक भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येक भाषा दुसऱ्या भाषेतील कळत न कळत रोजच्या व्यवहारातील शब्द जसेच्या तसे आपल्यात सामील करून घेत असतात. हे त्या प्रत्येक भाषेचे वैशिष्ट आहे म्हणा किंवा मोठेपण म्हणा ! कुठेही भेदभाव नाही. कदाचित भाषा अश्याच समृद्ध होत असतील?
काही शब्द आपल्या रोजच्या बोलीमध्ये इतके आपलेसे व सरावाचे झालेत की आपण कुठला शब्द कळत न कळत कुठे, केंव्हा व कश्यासाठी वापरतो हे लक्षात सुद्धा येत नाही. उदा. चायला, मायला, ऐला, सॉरी व थँक्यू हे व अश्या अनुषंगाने येणारे अनेक शब्द.
आपल्या आजूबाजूला वावरतांना नीट लक्ष देऊन ऐकाल व लक्षात ठेवालं तर कुठल्या ना कुठल्यातरी संधर्भात वरील शब्द आपण वारंवार उच्चारताना पाहतो. अर्थात हे शब्द मुद्दामून वापरले जात नाहीत तर सहज ओठावर दररोजच्या चांगल्या का वाईट सवयींमुळे का शिष्ठाचाराने येतात हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे एवढे खरे. पण काही शब्द काळ, वेळ, कारण व प्रसंगाचे भान न ठेवता वापरल्यास अर्थाचा अनर्थ होऊन आपण एका चांगल्या मित्राची/मैत्रिणीची एवढ्या वर्षाची मैत्री गमाविण्याची पाळी येऊ शकते.
एकदा असेच झाले. एका ऑफिसमध्ये दोन मित्र काही ऑफिसच्या काम निमित्त एका गंभीर विषयात गर्क होते व काम करून खूप कंटाळा आला होता म्हणून एका मित्राने सहज दुसऱ्या मित्रास विचारले “चायला येतोस का?” समोरच्या मित्राने लक्ष न देता प्रश्नार्थक चेहरा करून फक्त पहिले. तरी परत तोच प्रश्न, त्या मित्राने पुन्हा विचारला. या वेळेस दुसरा मित्र खूप भडकला
व म्हणाला अश्या शिव्या देऊन विचारू नकोस ! विचारणां करणाऱ्या
मित्राने सांगितले अरे माझ्या म्हणण्याचा उद्देश “चहा प्यायला येतोस का?” असा आहे व तू जे समजतोस त्या अर्थाने नाही विचारले. “तुला राग आला असेल तर सॉरी हं”
“सॉरी” व “थँक्यू” या दोन शब्दांच्या अतिरिक्त वापरने तर गिनीज बुकातील सगळ्याच गोष्टींच्या (इव्हेंटच्या) रेकॉर्डचे रेकॉर्ड ब्रेक केले असतील. हे शब्द तर इतके लवचिक आहेत की लवचीकतेच्या सगळ्या व्याख्या फिक्या पडतील. एखाद्याला सर्कशीतील कसरतपटूला कसरत करताना पाहिले की तोंडातून आपोआप शब्द निघतात “त्याचे शरीर किती लवचिक आहे” आपल्या रोजच्या दैनदिन जीवनात या दोन शब्दांच्या लवचीकतेचा अतिरेकी उपयोग करून लवचीकतेच्या सर्व मर्यादा पार करतो. पाश्चिमात्यांनी या दोन शब्दांनी आपल्याला जिंकले व आता आपण त्या अनमोल व बहुगुणी शब्दाने त्यांना जिंकत आहोत.
जगदीश पटवर्धन
वझिरा, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply