पर्वत शिखरीं जाऊन,खोदून आणली माती
कौशल्य पणास लावून,केला मी गणपती ।।१।।
मुर्ती बनली सुरेख,आनंद देई मनां
दाम मिळेल ठिक,हीच आली भावना
घेऊन गेलो बाजारीं,उल्हासाच्या भरांत
कुणी न त्यासी पसंत करी,निराश झालो मनांत
बहूत दिवस प्रयत्न केला,कुणी न घेई विकत
कंटाळून नेऊन दिला,गणपती मी शाळेत
भरले होते भव्य प्रदर्शन,हस्तकला कौशल्याचे
नवल वाटले गणपती बघून,दालनातील सुरवातीचे
चकीत झालो जाणूनी,मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
गणपतीच्या भव्यतेनी,मिळवीला हा अधिकार
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply