तू पाप की पुण्य ?….कळेना .
तू स्वार्थ की परमार्थ ?…. कळेना.
तू विष की अमृत ? ……कळेना.
तू छंद की आसक्ती ?….कळेना.
तू ध्यास की भास ?……. कळेना.
तू आस की आभास ?……कळेना.
तू नस की फास ?……कळेना.
तू श्वास की भ्रमनिरास ?…..कळेना.
तू मृगजळ की शाश्वत ?…… कळेना.
तू शांती की तगमग ?……. कळेना.
तू तहान की तृप्ती ?…….कळेना.
तू पर की आप ?…….. कळेना.
तू रोग की ईलाज ? …. कळेना.
तू मोह की विरक्ती ?…..कळेना.
तू भोग की योग ?…….कळेना.
तू पीडा की सुख?…… कळेना.
तू स्वप्न की सत्य?…. कळेना.
तू दाह की शीतल ?….कळेना.
तू वेगळी की समरस?….. कळेना.
तू कोडं की तोड ?……कळेना.
तू भविष्य की आयुष्य ?…..कळेना.
तू प्रीत की जीव ?….. कळेना.
तू माझी की मी तुझा? ….कळेना.
आपण एकरूप की एक ?…. कळेना.
–विशाल झावरेपाटील
Leave a Reply