पकल्या सावताची बायल, म्हणजे भागिरथी काकूची सून , लगिन झाल्यार आट वर्षानी गावाक ईली.. कारण तसा नाजूकच….. पोरग्या काय नाय पदरात… आता जिनच्या पँटीक पदर खयलो तो ईचारू नको…. तशि कर्तबगार सुन… 22 व्या माऴ्यारल्या मुंबयच्या हापिसातली सायबिन… 50 हजार म्हयन्याचो पगार… मुंबयतल्या सगळ्या डाक्टरांची भर करुन झाल्यार नाईलाज म्हणान म्हयनोभर सासयेच्या सांगण्यान घोवाक घेवन ईली…….
ईल्याबरोबर काकून तंबी दिल्यान…. पाच दिवस सकाळीच गोठ्यात जावन गायची पूजा कर, पाय धू तिचे… आणि थयच दोन चमचे गोमुत्र घे आणी मग घरात ये.. सुनेन आयकल्यान सासयेचा….. नाईलाज बाकी काय … रोज सांगल्याप्रमाणे केल्यान… वर सोनपापडेचो नेवेद्य दाखवल्यान…. आणि लवकर रिझट मिळाक व्हयो म्हणान रोज थयच धऱुन पेलोभर गोमुत्र पिल्यान.. असा पाच दिवस केल्यान….
शेवटच्या दिवशी काकूक संशय ईलो…. काय तरी भानगड हा……. म्हणान ईचारल्यान… गे सुने गाय आपली वायच भुजकट हा…
तुझ्याकडसून पुजा करून घेतल्यान कशी? सुनेन सांगल्यान… अहो ती काऴी गाय जवळ येऊच देत नव्हती.. पण पांढरी गाय खुप शांत आहे.. सेवा करून घेते.. मी पाच दिवस तिचे पेलाभर गोमुत्र पिते….. पण खरचं मला मुल होईल ना हो?
काकून कपाळावर हात मारल्यान आणि थयच खऴ्यात बसली…….. म्हणता कशी…. नक्की माका नातू जातलो….. कारण वाड्यात काळी गाय आणि भोरी म्हस आसा गे माझ्या आवशी…….
बापूर्झा
डॉ. बापू भोगटे….
Leave a Reply