आता कडक उन्हाळा सुरू झालाय. जिकडेतिकडे कलिंगडाचे ढीग रचलेले दिसतायत. उन्हामुळे शरीरातील कमी झालेलं पाणी भरुन काढायला कलिंगडाची मदत होते. ऊन्हाळ्यात फ्रूट-प्लेट सगळ्यांच्या आवडीची. त्यात आता कलिंगडाचं प्रमाण जास्तच असणार.
मात्र, कलिंगड खाताना त्यातील बिया आपण नेहमीच फेकून देतो. पुढच्यावेळी कलिंगड खाताना बिया फेकून देऊ नका. कलिंगडाप्रमाणेच त्याच्या बिया गुणकारी असून आपल्या शरीराला फायद्याच्या असतात.
कलिंगड बियाइसोबत खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. कलिंगडाच्या बियांमध्ये सिट्रालाइन हे अमायनो अॅसिड मुबलक प्रमाणात असते. याचा उपयोग रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास होतो.
हृदयविकाराचा त्रास कमी करण्यासाठीही कलिंगडाच्या बिया उपयुक्त आहेत. बियांमधील अॅन्टीऑक्सिडंट हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार कलिंगडाच्या बियांमधील फॅटस् घातक कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करतात.
किटाणूंच्या संसर्गाचा प्रतिकार करण्यासाठीही कलिंगडाच्या बियांचा उपयोग होऊ शकतो.
Leave a Reply